• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • कुत्र्याचा अमानुष छळ करत होता निर्दयी व्यक्ती; मदतीला धावून येत गाईनं घडवली अद्दल, भावुक करणारा VIDEO

कुत्र्याचा अमानुष छळ करत होता निर्दयी व्यक्ती; मदतीला धावून येत गाईनं घडवली अद्दल, भावुक करणारा VIDEO

या व्हिडिओमध्ये एक निर्दयी व्यक्ती कुत्र्याला त्रास देताना दिसत आहे (Man Harassing Dog). तो कुत्र्यासोबत अतिशय क्रूरपणे वागत आहे, इतक्यात एक गाई तिथे येते.

 • Share this:
  नवी दिल्ली 02 नोव्हेंबर : अनेकदा तुम्ही लोकांना असं म्हणताना ऐकलं असेल की कुत्रा हा माणसाचा सर्वात जवळचा मित्र असतो. त्यांच्या इतकं ईमानदार कोणीच असू शकत नाही. मात्र, अनेक लोक असे असतात ज्यांना प्राण्यांबद्दल अजिबातही प्रेम वाटत नाही. प्राण्यांना त्रास देण्यात त्यांना मजा येते. नुकताच असाच एक व्हिडिओ व्हायरल (Shocking Video Viral) झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक निर्दयी व्यक्ती कुत्र्याला त्रास देताना दिसत आहे (Man Harassing Dog). तो कुत्र्यासोबत अतिशय क्रूरपणे वागत आहे, इतक्यात एक गाई तिथे येते. झोपलेल्या कुत्र्याला उठवण्यासाठी मांजरीनं शोधली अजब पद्धत; पाहा मजेशीर VIDEO ट्विटरवर हा व्हिडिओ इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेजचे अधिकारी सुशांत नंदा यांनी पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये हा व्यक्ती रस्त्यावर उभा असल्याचं दिसतं. त्याच्यासोबत एक कुत्राही तिथेच उभा आहे. हा व्यक्ती कुत्र्याचा छळ करताना दिसत आहे. या व्यक्तीनं अतिशय वाईट पद्धतीनं कुत्र्याचे कान आणि त्याचं डोक दाबल आहे, यामुळे श्वानाला वेदना होत आहेत. कुत्रा वेदनेनं विव्हळत आहे, मात्र याचा त्या निर्दयी व्यक्तीवर काहीही परिणाम होत नाही. इतक्यात अचानक तिथे एक गाई येते. ही गाय आधी आपल्या शिंगाने कुत्र्याची सुटका करते (Cow Saves Dog) आणि नंतर या व्यक्तीवर हल्ला करते. गाईच्या हल्ल्यात हा व्यक्ती खाली कोसळतो आणि गाय त्याच्यावर त्याच पद्धतीनं हल्ला करते, ज्यापद्धतीने त्याने कुत्र्यावर केलेला. सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं - कर्मा. हा व्हिडिओ पोस्ट झाल्यापासून अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओला 1 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर 15 हजारहून अधिकांनी व्हिडिओ लाईकही केला आहे. लोकांनी गाईचं कौतुक केलं आहे तर व्हिडिओ बनवणाऱ्यावरही टीका केली आहे. काय ते प्रेम! दिवाळीपूर्वी एकमेकांचा नट्टापट्टा करताना दिसली माकडं, मजेशीर VIDEO एका यूजरनं म्हटलं, की ही गाई व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीपेक्षा खूप चांगली आहे. दुसऱ्या एकानं कमेंट करत म्हटलं, की हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, की या व्हिडिओमध्ये नेमकं प्राणी कोण आहे. माफ करा मात्र प्रश्नच उपस्थित होत नाही, की प्राणी हा व्यक्तीच आहे. तर आणखी एकानं यावर कमेंट करत म्हटलं की जो रेकॉर्डिंग करत आहे तोच जनावर आहे. एका युवकानं लिहिलं, की प्राणी एकमेकांचं दुःख समजू शकतात मात्र तिथे उपस्थित असलेली माणसं नाही.
  Published by:Kiran Pharate
  First published: