नवी दिल्ली 05 नोव्हेंबर : सोशल मीडियावर (Social Media) कधी काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. यातील काही व्हिडिओ (Viral Videos) असे असतात जे पाहताच आपल्याला हसू येतं. तर काही व्हिडिओ हैराण करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल, की बिचाऱ्या या व्यक्तीनं असं काय केलं होतं की त्याला इतकी मोठी शिक्षा मिळाली.
म्हातारपणी आजीबाईला लागला वेगळाच नाद; ती अजब इच्छा ऐकून घरचेही शॉक
ब्राझिलमधील हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यात दिसतं, की एक गाय धावत रस्त्यावर येते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की गाय धावत सरळ रहदारीच्या रस्त्यावर येते. यादरम्यान अनेक गाड्या रस्त्यावरुन जात असतात. इतक्यात ही गाय भरधाव वेगात असलेल्या एका दुकाचीला धडक देते (Cow Knocks Over Motorcyclist). काही कळायच्या आतच दुचाकीस्वार उडून रस्त्यावर कोसळतो. यानंतर गाय तिथून निघून जाते.
हा व्हिडिओ पाहून काही वेळासाठी तुम्हीही हैराण व्हाल. कारण हे प्रकरण जीवघेणंही ठरू शकत होतं. दुचाकीस्वाराला अंदाजच नव्हता की एक गाय त्याच्याकडेच धावत येत आहे. यामुळे त्याला स्वतःला सावरण्याची संधीही मिळाली नाही. सुदैवाने गाईने धडक दिल्यानंतर तो जास्त लांब कोसळला नाही. अन्यथा त्याला गंभीर दुखापत होऊ शकत होती.
‘हुस्न है सुहाना’ गाण्यावर नवरीबाईचे जबरदस्त ठुमके; हा Dance Video एकदा बघाच
हा व्हिडिओ Viral Hog ने आपल्या यूट्यूब अकाऊंटवरुन शेअर केला आहे. ज्या व्यक्तीनं हा व्हिडिओ शूट केला आहे, त्यानं सांगितलं की तो आपल्या कारमध्ये मित्राची वाट बघत बसला होता. इतक्यात एक गाई धावत आली आणि दुचाकीस्वाराला धडक दिली. आतापर्यंत 1 लाख 92 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, हा व्हिडिओ पाहून माझ्या डोक्यात अनेक जोक्स आले. मात्र या व्यक्तीला मार लागला आहे. तर दुसऱ्या एका यूजरनं सल्ला देत कमेंट केली की बाईक चालवताना नेहमी सावध राहायला हवं. आणखी एकानं कमेंट करत म्हटलं, गाई या दिवसाची बऱ्याच काळापासून वाट बघत होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking video viral