मुंबई, 04 डिसेंबर : जे अनेक मुलींना जमत नाही ते गायीनं काही सेकंदात करून दाखवलं आहे. आता तुम्हाला वाटेल असं काय केलं आहे? मुली कॅट वॉक जमावा म्हणून खूप प्रयत्न करत असतात. रॅम्प वॉक किंवा कॅट वॉक शिकण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते अनेकदा तर जमतच नाही ते या गायीनं काही सेकंदात अगदी सहजपणे करून दाखवलं आहे.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की गाय अगदी सहजपणे कॅटवॉक करत येत आहे. IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर तुफान कमेंट्स आल्या आहेत. तर कारमध्ये बसलेल्या तरुणानं या गायीचा व्हिडीओ काढला असून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. साडेपाच हजारहून अधिक लोकांनी गायीचा व्हिडीओ पाहिला आहे.
काही युझर्सनी ही गाय मूडमध्ये असल्याचं देखील म्हटलं आहे तर दोन युझर्सनी या गायीच्या पायाला काहीतरी त्रास असावा असा अंदाज व्यक्त केला आहे. तिसरा युझरनं या गायीला चांगल्या डॉक्टरकडे दाखवण्याचा सल्ला देखील दिला आहे.