मराठी बातम्या /बातम्या /Viral /एकमेकांच्या प्रेमात पडले भाऊ-बहीण; खुलासा करण्यासाठी फॅमिली ग्रुपवर टाकला असा फोटो की झालं भलतंच कांड

एकमेकांच्या प्रेमात पडले भाऊ-बहीण; खुलासा करण्यासाठी फॅमिली ग्रुपवर टाकला असा फोटो की झालं भलतंच कांड

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

दोघेही प्रेमात पडले, लग्न झालं, एक मूल झालं..पण विचित्र गोष्ट म्हणजे दोघेही भाऊ-बहीण आहेत!

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली 25 मार्च : प्रेमकथा ऐकायला खूप छान असतात, जोपर्यंत त्या कोणाला त्रास देत नाहीत. कधीकधी या कथा आपल्याला अस्वस्थ करतात, अमेरिकेतील एका जोडप्याची अशीच एक कहाणी आहे. दोघेही प्रेमात पडले, लग्न झालं, एक मूल झालं..पण विचित्र गोष्ट म्हणजे दोघेही भाऊ-बहीण आहेत! भारतासारख्या देशात भाऊ-बहिणीचं नातं हे पवित्र आणि सुंदर नातं मानलं जातं. मात्र अमेरिकेतील या जोडप्याबाबत काही वेगळंच होतं.

आली लहर केला कहर! एकटेपणाने कंटाळला, 300 मुलींना दिला धोका, प्रेमासाठी नाही तर...

डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेतील उटाह येथील रहिवासी मायकेल ली आणि अँजेला पेंग हे चुलत भाऊ-बहीण होते. अर्थात हे नातं खूप जवळचं होतं, पण दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघेही Amazon Prime च्या Extreme Love Show मध्ये दिसले होते, ज्यात त्यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल सांगितलं होतं.

लहानपणापासून दोघेही एकत्र खेळत मोठे झाले आणि लहानपणापासूनच दोघांमध्ये चांगली मैत्री निर्माण झाली. ते तरुण होईपर्यंत एकमेकांच्या प्रेमात पडले होते, पण जेव्हा घरच्यांना हे कळलं तेव्हा त्यांनी मायकेल आणि अँजेला एकमेकांपासून वेगळं केलं. दोघेही वर्षानुवर्षे एकमेकांना भेटले नाहीत. त्यांचं लग्नही वेगवेगळ्या लोकांसोबत झालं होतं, पण दुर्दैवाने दोघांचं लग्न 10 वर्षांनंतर तुटलं. अनेक वर्षांनंतर जेव्हा ते पुन्हा एका कौटुंबिक कार्यक्रमात भेटले तेव्हा त्यांना समजलं की त्यांचं एकमेकांवरील प्रेम जिवंत आहे आणि त्यांनी गुपचूप डेटिंग सुरू केली.

डेटिंग केल्यानंतर त्यांना समजलं की या नात्याबद्दल कुटुंबालाही सांगण्याची गरज आहे. मग त्यांनी एक विचित्र निर्णय घेतला. या बातमीचा खुलासा करण्यासाठी त्यांनी फेसबुकवर फॅमिली ग्रुपमध्ये किस घेतानाचे फोटो पोस्ट केले. हे पाहताच घरातील सदस्यांना धक्का बसला आणि त्यांना याची किंमत मोजावी लागली! कारण त्यांना वाटत होतं की घरातील लोक आता सहमत होतील, परंतु कोणीही त्या नात्याला सहमत झालं नाही. अनेकांनी त्यांच्याशी बोलणंही बंद केलं. परिस्थिती विपरीत असूनही दोघांनी लग्न केलं आणि २०२० मध्ये त्यांना एक मूलही झालं. मात्र, २०२१ मध्ये मायकेलचा मृत्यू झाला आणि आता अँजेला सिंगल मदर आहे.

First published:
top videos

    Tags: Love story, Viral news