मराठी बातम्या /बातम्या /Viral /

माझा जन्म का होऊ दिला? तरुणीने डॉक्टरविरोधातच दाखल केला गुन्हा, मिळाले 1 कोटी रूपये

माझा जन्म का होऊ दिला? तरुणीने डॉक्टरविरोधातच दाखल केला गुन्हा, मिळाले 1 कोटी रूपये

Girl facing Spina Bifida disease: डॉक्टरांनी तिच्या जन्माच्या पूर्वी तिच्या आईला योग्य सल्ला न दिल्यामुळे आईच्या शरीरात काही आवश्यक घटकांची कमतरता निर्माण झाली एव्हीला जन्मतःच स्पायना बिफिदा (Spina Bifida) नावाचा विकार झाला

लंडन 03 डिसेंबर : आपल्या जीवनात आपल्याला कोणी त्रास दिला तर त्याच्याविरुद्ध आपल्याला पोलिसांत तक्रार दाखल करता येते, कोर्टात जाता येतं. ब्रिटनमधल्या एव्ही टूम्बस (Evie Toombes) या 20 वर्षांच्या एका दिव्यांग तरुणीने मात्र आपल्या जन्माला कारणीभूत ठरलेल्या आपल्या आईच्या डॉक्टरला कोर्टात खेचलं आहे. डॉक्टरांनी तिच्या जन्माच्या पूर्वी तिच्या आईला योग्य सल्ला न दिल्यामुळे आईच्या शरीरात काही आवश्यक घटकांची कमतरता निर्माण झाली आणि त्यामुळे एव्हीला जन्मतःच स्पायना बिफिदा (Spina Bifida) नावाचा विकार झाला. त्यामुळे तिच्या हालचालींवर प्रचंड मर्यादा आहेत.

डॉक्टरांनी योग्य सल्ला दिला असता, तर आईने आपल्याला जन्मालाच घातलं नसतं, असं एव्हीचं म्हणणं आहे. यापुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिने दाखल केलेला हा खटला तिने जिंकला असून, काही दशलक्ष डॉलर्सची नुकसानभरपाई मिळण्यास ती पात्र असल्याचा निकाल कोर्टाने एक डिसेंबर रोजी दिला आहे. 'द सन'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

एव्हीला Lipomyelomeningocele या प्रकारचा स्पायना बिफिदा हा विकार आहे. या विकारात बाळ जन्माला येतानाच त्याच्या पाठीचे मणके आणि कण्यात कायमस्वरूपी दोष असतो. हा विकार असूनही एव्हीनं शो जंपिंगच्या क्षेत्रात अत्यंत चमकदार कामगिरी केली आहे. तिला 2008 मध्ये Inspiration Young Person Awardने गौरवण्यात आलं आहे. त्यावेळी तिला डचेस ऑफ ससेक्स (Dutches of Sussex) मेगन मार्केलला (Megan Markel) भेटायचीही संधी मिळाली होती; मात्र अनेकांची प्रेरणास्रोत असलेल्या या तरुणीने आपल्याला चुकीचं आयुष्य दिल्याबद्दल तिच्या आईच्या डॉक्टरविरोधात खटला दाखल केला होता. डॉ. फिलिप मिशेल असं त्यांचं नाव आहे.

होणाऱ्या बाळाला स्पायना बिफिडासारखा विकार होण्याची जोखीम कमी करण्यासाठी फॉलिक अॅसिडच्या गोळ्या घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी आपल्या आईला दिला असता, तर आपण जन्मालाच आलो नसतो किंवा आपल्याला जन्मतःच हा विकार झाला नसता, असं एव्हीचं म्हणणं होतं.

एव्हीच्या आईने कोर्टाला सांगितलं, की 'मला डॉक्टरांकडून असा सल्ला देण्यात आला होता, की मी योग्य आहार घेतला, तर मला फॉलिक अॅसिडच्या गोळ्या घ्याव्या लागणार नाहीत.'

या प्रकरणावर लंडन हायकोर्टाच्या न्या. रोझलिंड कोए यांनी ऐतिहासिक निकाल सुनावला. कोर्टाने म्हटलं की 'एव्हीच्या आईला योग्य सल्ला दिला गेला असता, तर त्या गर्भवती होण्याचा निर्णय थोडा पुढे ढकलू शकल्या असत्या. त्यामुळे शरीरात योग्य परिस्थिती तयार झाल्यावर त्या गर्भवती झाल्या असत्या. यामुळे एक आरोग्यपूर्ण आणि सर्वसामान्य बाळ जन्माला आलं असतं. त्यामुळे या केसमध्ये एव्हीला मोठी नुकसानभरपाई मिळण्याचा अधिकार आहे.'

एव्हीला काही दशलक्ष डॉलर्सची नुकसानभरपाई मिळणार आहे. या निकालाकडे एक ऐतिहासिक निर्णय म्हणून पाहिलं जात आहे. कारण गर्भधारणापूर्व काळातल्या चुकीच्या सल्ल्यामुळे जन्माला येणाऱ्या बाळात काही व्यंग निर्माण झाल्याचं सिद्ध झालं, तर डॉक्टरला दोषी ठरवलं जाऊ शकतं, हे यातून दिसून आलं आहे.

First published:

Tags: Britain, London, Viral news