Home /News /viral /

डिजिटल नातं! फेसबुकवर ओळख, मग व्हिडिओ कॉलवर प्रपोज आणि झूमवर केलं ऑनलाईन लग्न

डिजिटल नातं! फेसबुकवर ओळख, मग व्हिडिओ कॉलवर प्रपोज आणि झूमवर केलं ऑनलाईन लग्न

एकमेकांसोबत ऑनलाईन गप्पा मारूनच ते अगदी जवळ आले. याच वर्षी मे महिन्यात डॅरिनने आयसीला प्रपोज करण्याचा निर्णय घेतला.

    नवी दिल्ली 15 नोव्हेंबर : कोरोना काळात अनेक लोकांनी आपलं आयुष्यच पूर्णपणे डिजीटल केलं. अभ्यासापासून नोकरीपर्यंत आणि कुटुंबाच्या गाठीभेटीपासून ऑफिस मीटिंग्सपर्यंत सगळंच ऑनलाईन होऊ लागलं आहे. इतकंच नाही तर कोरोना काळात लोक एकमेकांना भेटूही शकत नसल्याने प्रेमही ऑनलाईनच होत आहे. नुकतंच एक कपल चांगलंच चर्चेत आलं आहे. या कपलच्या डिजीटल नात्यानं (Digital Relationship) सर्वांनाच थक्क केलं आहे. चोरी करण्यासाठी घरात शिरला पण सुंदर महिला दिसतात बदललं चोराचं मन आणि मग... हैराण करणारी बाब म्हणजे हे दोघंही आजपर्यंत कधीच एकमेकांना भेटले नाहीत आणि तरीही त्यांनी एकमेकांसोबत लग्नही केलं आहे (Couple Tie the Knot Via Zoom Call). ब्रिटनच्या लँकेस्टर येथील रहिवासी असलेली 26 वर्षाची आयसी मागील वर्षी लॉकडाऊनच्या काळात खूपच कंटाळली. यामुळे तिनं फ्रेंडशिप करण्यासाठीचा फेसबुक ग्रुप जॉईन केला. या ग्रुपमध्येच तिची ओळख अमेरिकेच्या Detroit मध्ये राहणाऱ्या 24 वर्षीय डॅरिनसोबत झाली. दोघांनी चॅटिंग करण्यास सुरुवात केली आणि हळूहळू त्यांचं व्हिडिओ कॉलवरही बोलणं होऊ लागलं. एकमेकांसोबत ऑनलाईन गप्पा मारूनच ते अगदी जवळ आले. याच वर्षी मे महिन्यात डॅरिनने आयसीला प्रपोज करण्याचा निर्णय घेतला. व्हिडिओ कॉलवरच तो आपल्या गुडघ्यावर बसला आणि आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं (Proposal on Video Call). आयसीनं होकार दिला आणि नंतर तिला समजलं की डॅरिननं तिच्यासोबत बोलण्याआधीच तिच्या वडिलांसोबत याबाबत चर्चा केली होती. हे ऐकून ती आणखीच आनंदी झाली. दुकानात शिरून चोरी केली पण CCTV वर नजर पडताच करू लागला डान्स; हा VIDEO एकदा बघाच दोघांनी याच वर्षी झूम कॉलच्या माध्यमातून अधिकृतपणे लग्नगाठही बांधली. आतापर्यंत हे दोघं एकमेकांना प्रत्यक्षात भेटलेही नाहीत. आयसीनं डॅरिनच्या चेहऱ्याप्रमाणे दिसणारं एक सॉफ्ट टॉयदेखील बनवलं आहे. यामुळे तिला वाटतं की डॅरिन तिच्या जवळच आहे. आयसीचं म्हणणं आहे, की कोरोनामुळे त्यांची भेट होत नाहीये. मात्र हेच चांगलं आहे. कारण जेव्हा ते एकत्र येतील तेव्हा तो क्षण साजरा करू शकतील.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Online dating, Viral news

    पुढील बातम्या