• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • आधी जेवण ऑर्डर केलं, मग....; कपलनं अतिशय हुशारीनं हॉटेलमधून लंपास केली करोडो रुपयांची वाईन बॉटल

आधी जेवण ऑर्डर केलं, मग....; कपलनं अतिशय हुशारीनं हॉटेलमधून लंपास केली करोडो रुपयांची वाईन बॉटल

नुकतंच या हॉटेलमधून वाईनच्या तब्बल 45 बाटल्या चोरी गेल्या. यातील काही बाटल्यात 19 व्या शतकातील होत्या. मात्र, यातील एक वाईन बॉटल इतकी महाग होती, की यामुळे हॉटेलचं मोठं आर्थिक नुकसान झालं.

 • Share this:
  नवी दिल्ली 31 ऑक्टोबर : ज्या लोकांना वाईन पिणं आवडतं, त्यांना माहिती असेल की जगात अनेक अशा वाईन्स आहेत, ज्यांच्या किमती भरपूर आहेत. असं म्हटलं जातं, की वाईन जितकी जुनी असते, तितकी तिची किंमत वाढत जाते. अनेक लोकांना तर किमती वाईन्स कलेक्ट करण्याचा छंद असतो (Special Wine Collection). त्यामुळे, महागड्या वाईन्सची मागणीही खूप असते. ज्यांच्याकडे भरपूर पैसे असतात, असे लोक या वाईन खरेदी करतात. मात्र, काही लोक असेही असतात जे याची चोरी करतात. नुकतंच असंच एक प्रकरण स्पेनमधून समोर आलं आहे. यात एका कपलनं अतिशय किमती वाईनची बॉटल चोरी केली (Couple Stole Expensive Wine Bottle) . घरातून विचित्र आवाज येत असल्यानं सर्पमित्राला बोलावलं; सत्य समोर येताच शरमली स्पेनच्या कॅसिरस शहरातील एका बातमीनं सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं. इथे अॅट्रिओ नावाचं एक प्रसिद्ध हॉटेल आहे. हे हॉटेल इथल्या जेवणामुळे आणि सर्व्हिसेसमुळे जितकं ओळखलं जातं, त्यपेक्षा अधिक महागड्या वाईन कलेक्शनमुळे ओळखलं जातं. नुकतंच या हॉटेलमधून वाईनच्या तब्बल 45 बाटल्या चोरी गेल्या. यातील काही बाटल्यात 19 व्या शतकातील होत्या. मात्र, यातील एक वाईन बॉटल इतकी महाग होती, की यामुळे हॉटेलचं मोठं आर्थिक नुकसान झालं. 1806 च्या Chateau d’Yquem नावाच्या या वाईनची किंमत 3 कोटीहून अधिक होती. ही वाईन फ्रान्सच्या खास वाईन मेकरनं बनवली होती. ही या हॉटेलच्या खास वाईन्समधील एक होती. परीक्षेत मुलाने दाखवली अजब क्रिएटिव्हिटी; सरांनीही दिलं भन्नाट उत्तर हॉटेलचे मालक जोस पोलो यांनी इंग्रजी बोलणाऱ्या एका कपलवर चोरीचा आरोप केला आहे. त्यांचं म्हणणं आहे, की कपलनं हॉटेलमध्ये चेक इन केलं आणि हॉटेलच्याच मेशलिन रेस्टॉरंटमध्ये जेवण केलं. जेव्हा हॉटेलचा स्टाफ महिलेला जेवण देत होता तेव्हा तिचा पती हळूहळू हॉटेलच्या सेलर म्हणजेच जिथे वाईनच्या बॉटल ठेवल्या जातात तिथे गेला आणि त्याने महागड्या बाटल्या चोरल्या. हॉटेलचा स्टाफ गेस्टमध्येच व्यस्त असल्याने सिक्योरिटी कॅमेऱ्याकडेही कोणाचं लक्ष गेलं नाही. दोघांनी हॉटेलमधून चेकआऊटही केलं आणि तिथून निघून गेले. ते तिथून गेल्यानंतर चोरी झाल्याचं लक्षात आलं. हॉटेलच्या मालकानं सांगितलं की दोघंही प्रोफेशनल दिसत होती. मात्र ही चोरी करताना ते जराही घाबरले नाहीत. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून सर्व बाटल्यांच्या किमतीचा हिशोब लावला जात आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: