मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Video Viral : स्पोर्ट्स बाईकवर कपलचा रोमान्स, हातात गुलाब घेऊन धक्कादायक कृत्य

Video Viral : स्पोर्ट्स बाईकवर कपलचा रोमान्स, हातात गुलाब घेऊन धक्कादायक कृत्य

व्हायरल फोटो

व्हायरल फोटो

अचानक मुलगा हँडलवरून हात काढून मागे वाकतो, गुलाबाचे फूल काढतो आणि मुलीला देऊन आपले प्रेम व्यक्त करू लागतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 24 जानेवारी : सोशल मीडियावरील काही तरुण मंडळी फेमस होण्यासाठी आणि काही लाईक्ससाठी आपल्यासोबत इतरांचे प्राण देखील धोक्यात टाकतात. व्हायरल होण्यासाठी लोक काहीही करण्याची तयारी दाखवतात. मग अगदी ते काहीही असोत. अलीकडच्या काळात सोशल मीडियावर चालत्या बाईकवर रोमान्सची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. त्यांपैकी काही प्रसिद्धीसाठी लोकांनी स्वत: काढलेले व्हिडीओ आहेत. तर काही जोडप्यांचा व्हिडीओ इतर लोकांनी व्हायरल केला आहे. अशापद्धतीने गाडी चालवणे हे खरंच धोकादायक आहे.

अशातच एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायर झाला आहे. या व्हिडीओमध्ये स्पोर्ट्स बाईकवर तरुण आणि तरुणी बसलेली दिसत आहे. तरुण बाईक चालवत आहे, तरुणी त्याच्या समोर टाकीवर बसली आहे. तेही तरुणाकडे तोंड करुन. हा दोघांनी हेल्मेट घातले आहे. यासोबतच दोघांच्या पाठीमागे छोटी बॅग देखील दिसत आहेत.

हे ही पाहा : डोंगराळ भागात अचानक हवेत उडू लागली बस, Video पाहून तुम्हीही चक्रावाल

दरम्यान, दुचाकी चालवत असताना अचानक मुलगा हँडलवरून हात काढून मागे वाकतो, गुलाबाचे फूल काढतो आणि मुलीला देऊन आपले प्रेम व्यक्त करू लागतो. हा प्रेमाचा प्रस्ताव पाहून ती मुलगीही त्या गुलाबाला आपल्या हातात घेते.

बऱ्याच मुलींना अशी काहीतरी हटके करणारी मुलं आवडतात आणि त्या अशा मुलांच्या प्रेमात पडतात. पण यासाठी असा प्राण धोक्यात घालणे कितीपत योग्य आहे? याचा ते अजिबात विचार करत नाहीत.

हे ही पाहा : एक चाकाच्या बाईकवर दाखवला खतरनाक स्टंट, पण पुढच्याच क्षणी मृत्यूशी भेट, Video Viral

आश्‍चर्याची बाब म्हणजे, यादरम्यान दुचाकी रस्त्यावरून वेगाने धावताना दिसते. थोडासाही तोल बिघडला असता तर दोघेही पडून जखमी झाले असते. या व्हिडीओवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. परंतु पोलिसांनी यावर कारवाई केल्याचं अजून तरी समोर आलेलं नाही.

First published:

Tags: Shocking video viral, Social media, Social media trends, Stunt video, Top trending, Viral