मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - लव्ह बर्ड्सचा रोमान्स, चोरट्यांनी मारला चान्स; कपलला नग्न अवस्थेत रस्त्यावर आणलं आणि...

VIDEO - लव्ह बर्ड्सचा रोमान्स, चोरट्यांनी मारला चान्स; कपलला नग्न अवस्थेत रस्त्यावर आणलं आणि...

कपलला चोरट्यांनी लुटलं.

कपलला चोरट्यांनी लुटलं.

कारमध्ये रोमान्स करणाऱ्या कपलसोबत चोरांनी जे केलं ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Priya Lad

ब्राझिलिया, 02 सप्टेंबर : चोरीचे तसे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण सध्या सोशल मीडियावर असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे जो पाहून तुम्ही हैराण व्हाल. एक कपल कारमध्ये रोमान्स करत होतं, त्याचवेळी काही चोर तिथं आले. कपलला रोमान्समध्ये बुडाल्याचं पाहून त्यांनी चान्स मारला. त्यांनी कपलसोबत जे केलं ते धक्कादायक आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

ब्राझीलमधील ही घटना आहे. रस्त्यावर गाडी पार्क करून त्यात एक कपल रोमान्य करत होतं. त्यावेळी त्यांच्यावर चोरट्यांची नजर पडली आणि त्यांनीही या संधीचा फायदा करून घेतला. व्हिडीओत पाहू शकता रस्त्यावर पांढरी कार उभी दिसते आहे. तीन लोक त्या गाडीजवळ जातात. एक व्यक्ती गाडीच्या ड्रायव्हिंग सीटजवळील खिडकीजवळ जाते. एक कारच्या मागे उभी राहते आणि एक कारच्या मागील खिडकीजवळ.

हे वाचा - धक्कादायक! विमानात प्रवासी पाठवत होते अश्लिल फोटो, संतापून वैमानिकाने केलं असं काही...पाहा VIDEO

कारच्या मागील खिडकीजवळ असलेली व्यक्ती खिडकी ठोकवतं. त्यानंतर दोघंही कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात. कसाबसा ते पुढील दरवाजा उघडतात आणि नंतर भीतीने कपल मागील दरवाजा उघडून बाहेर येण्याचा प्रयत्न करतं. चोर त्या दोघांना खेचून कारमधून बाहेर काढतात. दोघांच्याही अंगावर एकही कपडा नसतो. दोघंही नग्न अवस्थेत असतात.

त्यानंतर तिन्ही चोर कारमध्ये बसतात. कपल त्यांच्याकडे कपडे मागू लागतं. एक चोर गाडीत बसताच कपलचे काही कपडे गाडीबाहेर फेकतो आणि तिघंही कार घेऊन तिथून पसार होतात. मोजके कपडे घेऊन हे कपल कसंबसं आपलं शरीर झाकून इज्जत राखण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

हे वाचा - मध्यरात्री महिलेची छेड काढण्यासाठी यायचा 'भूत', अखेर कोर्टात समोर आलं या आत्म्याचं रहस्य!

डेली मेलच्या रिपोर्टनुसार हे प्रकरण 17 ऑगस्टचं आहे. रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पण हे पीडित कपल आणि चोरांची ओळख पटलेली नाही. जर ओळख पटली तर या कपलाही शिक्षा होऊ शकते. कारण ब्राझीलमध्ये सार्वजनिक ठिकाणी रोमान्स करणं गुन्हा आहे.

First published:

Tags: Couple, Crime, Romance, Viral, Viral news