• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • विना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, उद्धट महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO

विना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, उद्धट महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO

दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये (Video) महिला म्हणत आहे, की मी यूपीएससी पास आहे. महिला पुढे म्हणाली, की मी स्वतःच्याच कारमध्ये मास्क (Mask) का वापरु?

 • Share this:
  नवी दिल्ली 19 एप्रिल : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) प्रसार वाढतच आहे आणि रोज रुग्णसंख्येचा नवीन रेकॉर्ड नोंदवला जात आहे. मात्र, अशा परिस्थितीमध्येही काही लोक नियमांचं पालन न करता सर्रास फिरताना दिसत आहेत. असंच एक प्रकरण दिल्लीमधून समोर आलं आहे. इथे एक कपल विना मास्क कारमध्ये बसलेलं होतं. पोलिसांनी जेव्हा त्यांना अडवलं तेव्हा या कपलनं पोलिसांनाच धमकी देण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video of Couple) झाला आहे. पोलिसांचं म्हणणं आहे, की दिल्लीच्या पटेल नगरमधील रहिवासी असलेल्या पंकज आणि त्याची पत्नी आभा यांना विना मास्क कारमध्ये बसल्यानं पोलिसांनी अडवलं. यानंतर या जोडप्यानं पोलिसांवरच ओरडण्यास सुरुवात केली. दिल्ली पोलिसांनी या घटनेचा व्हिडिओदेखील शेअर केला असून यात हे कपल पोलिसांसोबत वाद घालत चुकीची भाषा वापरताना दिसत आहे. Paparazzi ना पाहताच सुरू झाली लपवा-छपवी; अभिनेत्याने का लपवला चेहरा? दिल्ली पोलिसांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये महिला म्हणत आहे, की मी यूपीएससी पास आहे. यावर पोलिसांनी म्हटलं, की तुम्ही यूपीएससी पास असाल तर तुम्ही अजून जास्त जबाबदारीनं वागायला हवं. महिला पुढे म्हणाली, की मी स्वतःच्याच कारमध्ये मास्क का वापरु? काय होईल? जर मी माझ्या पतीला किस केलं तर? बराच वेळ वाद झाल्यानंतर या कपलला दरियागंज पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आलं. त्यांच्याविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आलं. 7 एप्रिल रोजी दिल्ली उच्च न्यायालयानं कार पब्लिक प्लेस असल्याचं म्हटलं होतं आणि असंही स्पष्ट केलं होतं, की कोणी व्यक्ती स्वतःच्या गाडीमध्ये एकटा प्रवास करत असेल तरीही मास्क वापरणं बंधनकारक आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: