मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - गर्लफ्रेंडला तिच्याच घरात भेटण्यासाठी बॉयफ्रेंडचा जबरदस्त जुगाड; कुणाला साधी भनकही लागली नाही

VIDEO - गर्लफ्रेंडला तिच्याच घरात भेटण्यासाठी बॉयफ्रेंडचा जबरदस्त जुगाड; कुणाला साधी भनकही लागली नाही

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला तिच्या घरात तिच्या कुटुंबासमोर भेटला पण कुणाला समजलंही नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Priya Lad

मुंबई, 04 डिसेंबर : गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड एकमेकांना लपूनछपून भेटत असल्याची बरीच प्रेम प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. किंबहुना तुम्हीसुद्धा एकमेकांना असंच लपूनछपून भेटला असाल. अनेकांच्या मते तर असं लपूनछपून प्रेम करण्याची मजाच काही और असते. पण काही वेळा एकमेकांना भेटता येणं शक्य होत नाही आणि एकमेकांना पाहिल्याशिवायही राहवत नाही. त्यावेळी मग शक्यतो बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी तिच्या घरीच जातो. पण हे वाटतं तितकं सोपं नाही. प्रेमीयुगुलासाठी हे मोठं आव्हानच म्हणावं लागेल. अशाच एका कपलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

एक बॉयफ्रेंड त्याच्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी तिच्याच घरी गेला. घरी जाऊन तो तिला लपूनछपून भेटला नाही तर सर्वांच्या समोर तिला भेटला. इतकंच नव्हे तर तिच्या कुटुंबासोबत त्याने खाणंपिणंही केलं. पण हा आपल्या मुलीचा बॉयफ्रेंड आहे याची भनकही तिच्या घरातील कोणत्या सदस्याला लागली नाही. बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला तिच्याच घरी भेटण्यासाठी असा जबरदस्त जुगाडच केला होता. आता हा जुगाड काय ते तुम्हीच पाहा.

हे वाचा - तुम्ही जे म्हणाल ते तो ऐकेल; नवरा-BF ला मुठीत ठेवण्याचे ऑनलाईन धडे देते महिला

व्हिडीओत पाहू शकता. एक तरुणी दिसते आहे, जी घरात आहे. थोड्या वेळाने ती दरवाजा उघडते. दरवाजातून एक महिला आत येते. तरुणी तिचा पाहुणाचर करताना दिसते. त्यावेळी तिच्या घरातील सदस्यही त्यांच्यासोबत बसलेला आहे. खाऊनपिऊन झाल्यावर तरुणी बाथरूममध्ये हात धुवायला जाते. तिच्यासोबत ती महिलाही जाते. आता खरा ट्विटस्ट आहे.

या व्हिडीओत जी महिला आहे ती बुरखा घातलेली आहे. जशी ती त्या तरुणीसोबत बाथरूममध्ये जाते तेव्हा ती आपला बुरखा वर करते आणि हे काय, जिला तरुणीच्या कुटुंबातील लोक आणि आपणही महिला समजत होतो तो खरंतर पुरुष आहे.

हे वाचा - पतीला सोडून बहिणीसोबत हनिमूनला गेली नवरी; संपूर्ण सत्य समजताच नवरदेवाची पोलिसांत धाव

बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी तिच्या घरी बुरखा घालून गेला. जेणेकरून तिच्या घरातल्यांना तिची मैत्रीणच आली असं वाटलं. बुरखा घालून हा तरुण आपल्या गर्लफ्रेंडच्या वडिलांच्या बाजूला बजला. त्यांच्यासोबत खाल्लं आणि नंतर गर्लफ्रेंडसोबत एकांतही घालवला.

@kashyap_memer ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुम्हाला हा जुगाड कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

First published:

Tags: Boyfriend, Couple, Girlfriend, Viral, Viral videos