Home /News /viral /

बापरे! ही अशी कसली मजा? कपलचा हा VIDEO पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा

बापरे! ही अशी कसली मजा? कपलचा हा VIDEO पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा

Couple bungee jumping video viral : कपलने मजेमजेत असं काही केलं की तुम्हालाही धडकी भरेल.

    मुंबई, 22 जून : सोशल मीडियावर कपलचे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही रोमँटिक, काही इमोशनल तर काही मजेशीर असतात. सध्या अशा कपलचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून तुमच्या अंगावर काटाच येईल. हृदयाचा ठोका चुकवणारा असा हा व्हिडीओ आहे. कपलने मजेमजेत असं काही केलं की तुम्हालाही धडकी भरेल (Couple bungee jumping video viral). कपलमध्ये मजामस्तीही असते. पण या कपलने जी मजा केली आहे, जी तुमच्या हृदयाची धडधड वाढवेल. व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला हे कपल एका ठिकाणी उभं दिसतं. कपल जिथं उभं आहे, तो एक उंच डोंगर आहे. डोंगराच्या कडेजवळ दोघंही उभे आहेत. गर्लफ्रेंड पुढे आणि बॉयफ्रेंड तिच्या मागे आहे. अचानक बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला धक्का देतो. तरुणी डोंगरावरून खाली कोसळते. ती इतक्या खोलवर जाते की पाहून आपल्याची हृदयाचा ठोका चुकतो. हे वाचा - विंडो सीटसाठी काहीही! विमान प्रवासादरम्यान महिलेचं धक्कादायक कृत्य; VIDEO पाहून भडकले नेटिझन्स व्हिडीओ तुम्ही नीट पाहाल तर तरुणीला दोरी बांधलेली आहे. म्हणजे हा व्हिडीओ बंजी जम्पिंगचा आहे. बंजी जम्पिंगचा हा भयंकर असा व्हिडीओ आहे. कारण तरुणी जरी बंजी जम्पिंग करत असली तरी ती त्याआधी नीट तयार नव्हती आणि तिला माहिती नसताना अचानक तिच्या बॉयफ्रेंडने तिला धक्का दिला. बॉयफ्रेंडच्या या प्रतापामुळे ती इतकी घाबरली की तिने तिथंच ब्रेकअपही केलं. मी तुझ्याशी ब्रेकअप करते, असं ती मोठ्याने किंचाळते. @ChannelInteres ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. गर्लफ्रेंडपासून सुटका मिळवण्याचा मार्ग असं मजेशीर कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. पण हा व्हिडीओ धक्कादायक आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Couple, Relationship, Viral, Viral videos

    पुढील बातम्या