न्यू साउथ वेल्स, 24 मार्च: आपलं लग्न कसं व्हावं याबाबत जोपडप्यांच्या अनेक कल्पना असतात. काहींना डेस्टिनेशन वेडिंग करायचं असतं, तर काहींना पारंपारिक पद्धतीनं लवाजमा मिरवत सात फेरे घ्यायचे असतात. असं असलं तर ऑस्ट्रेलियामध्ये एक अजब लग्न (Marriage in Australia) पार पडलं आहे. त्यांच्या लग्नाचा एक व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. गावात आलेल्या भयंकर पुरामुळे घराभोवती पाणी साचलं होतं. तरीही त्यांनी लग्न (wedding in flood) केलं आहे. अशाप्रकारे लग्न केल्यामुळे वधूची पाठवणी करण्यासाठी एअरलिफ्ट करावं लागलं आहे.
सध्या ऑस्ट्रेलियातील बऱ्यांच शहरांना भयंकर पुराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. न्यू साउथ वेल्स या शहरालाही पुराने ग्रासलं आहे, शिवाय सातत्याने जोरदार पाऊसही सुरू आहे. खराब हवामानामुळे परिसरातील 18 हजार लोकांना स्थलांतर करावं लागले आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत ऑस्ट्रेलियातील एका जोपड्याचं लग्न होणार होतं. पण महापुराने सगळा घोळ घातला. असं असलं तरी संबंधित जोडप्यानं हार मानली नाही त्यांनी त्याच दिवशी लग्न करण्याचं ठरवलं. Kate Fotheringham आणि वायने बेल असं या जोडप्याचं नाव आहे.
Update, I made it to the church and married the love of my life! Affinity Helicopters in Port Macquarie came to the rescue and made sure we all got there. This is the bridge that blocked us from making the 5minute drive into town! What a day! #fotherbellwedding #floodwingham pic.twitter.com/u7OlsFsTjQ
— Kate Fotheringham (@KatelFog) March 22, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित लग्न 20 मार्च रोजी मिड नॉर्थ कोस्टच्या विंघम याठिकाणी होणार होतं. परंतु चारही बाजूंनी घराला पुराने वेढा दिल्यानं कुटुंबीयांसहित संबंधित जोडपं अडकून पडलं होतं. दोघांनाही लग्न पुढं ढकलण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी अशा आपत्कालीन परिस्थितीतच लग्न करण्याचा निर्णय घेतला. सर्वांना पुराच्या पाण्यात वेढलेलं पाहून केटनं ट्विटरद्वारे मदत मागितली आणि त्वरित तिला मदतही करण्यात आली.
हे ही वाचा -अवघे पाऊणशे वयमान! 78व्या वर्षी 17 वर्षांच्या मुलीशी लग्न केलं खंर; पण 22 दिवसांतच...
त्यानंतर केटच्या मदतीसाठी एफिनिटी कंपनीचं एक हेलिकॉप्टर त्याठिकाणी आलं. त्यानंतर हेलिकॉप्टरनं वधू-वर यांच्यासमवेत त्यांच्या परिवाराला चर्चपर्यंत पोहचवलं. संबंधित जोडप्यांच्या घरापासून चर्च अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर होतं, परंतु परिसरात आलेल्या पुरामुळे त्यांना चर्चपर्यंत पोहचता येत नव्हतं. पण प्रशासनाने त्यांना वेळेवर मदत केली, ज्यामुळं त्यांचं लग्नही वेळेवर होऊ शकलं. एवढंच नाही तर संबंधित वधूची पाठवणी देखील हेलिकॉप्टरनं करण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Marriage, Rain flood