Home /News /viral /

गार्डनमध्ये कचरा उचलताना कपलला सापडली खूप जुनी वस्तू, वाचा का आहे खास

गार्डनमध्ये कचरा उचलताना कपलला सापडली खूप जुनी वस्तू, वाचा का आहे खास

आयुष्य हे अनेक सरप्राइजेसनी भरलेलं आहे. काही गोष्टी अनपेक्षितपणे घडतात आणि आयुष्य बदलून टाकतात. या गोष्टींतून मोठा आनंद मिळतो.

एडिनबर्ग, 20 फेब्रुवारी: आयुष्यात पुढच्या क्षणी तुम्हाला काय होईल, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आयुष्य हे अनेक सरप्राइजेसनी भरलेलं आहे. काही गोष्टी अनपेक्षितपणे घडतात आणि आयुष्य बदलून टाकतात. या गोष्टींतून मोठा आनंद मिळतो. स्कॉटलंडमधल्या एका दाम्पत्याच्या बाबतीत असाच काहीसा प्रकार घडला आहे. उद्यानातला कचरा उचलताना त्यांना चिप्सचं एक पाकिट सापडलं आहे. आता तुम्ही म्हणाल, की एका चिप्सच्या पाकिटाचं काय एवढं कौतुक? पण हे चिप्सचं पाकिट काही साधंसुधं नसून, तब्बल 50 वर्षं जुनं (50 Years Old Chips packet) आहे. स्कॉटलंडमधल्या 45 वर्षीय शेरॉन लॉन्गहर्स्ट आणि त्यांचे 55 वर्षीय पती अँडी हे दाम्पत्य किर्ककॅल्डी येथे वास्तव्याला आहे. शेरॉनचा पती बस ड्रायव्हर आहे. हे दोघे डनिकियर पार्कमध्ये कचरा उचलत होते. तेव्हा त्यांना चिप्सचं (Couple Got 50 Years Old Chips) एक पाकिट आढळलं. ते पाकिट साधंसुधं नसून खूप खास असेल, असं त्यांच्या ध्यानीमनीही नव्हते. ते पाकिट घेऊन ते घरी आले. पाकिट साफ केल्यानंतर त्यांना ते 3-4 वर्षांपूर्वीचं नव्हे, तर 50 वर्षं जुनं असल्याचं समजलं. आपल्याला एक दुर्मीळ गोष्ट सापडली आहे, यावर त्यांना विश्वासच बसत नव्हता. याआधी त्यांना कचरा उचलताना अशी एखादी जुनी वस्तू कधीच सापडली नव्हती. हे वाचा-VIDEO: पाण्यात बुडवलं, त्यावरून कारही चालवली; 'या' स्मार्टफोनला काहीच झालं नाही चिप्सचं हे पाकिट विकलं गेलं तेव्हा त्याची किंमत अगदी नाममात्र होती. तसंच पाकिटावर 'खरेदीदार स्पर्धेत सहभागी होऊ शकतात आणि विनामूल्य फुटबॉल बॅज मिळवू शकतात,' अशी ऑफरही होती. वाटेत चालत असताना त्यांना हे पाकिट दिसलं. तेव्हा हे पाकिट 2005 सालचं किंवा 2000, 1995 किंवा फार तर 1990 चं असावं, असं त्यांना वाटलं होतं; पण प्रत्यक्षात हे पाकिट त्याहूनही जुनं होतं, असे डेली स्टारशी बोलताना शेरॉन यांनी सांगितलं. हे वाचा-चिखलात फोटोशूट करायला निघालेले नवरी-नवरदेव; पाय घसरताच झाली भलतीच फजिती, Video या चिप्सच्या पाकिटाचं पॅकिंग 1969 मध्ये करण्यात आलं होतं. हे पाकिट साफ केल्यानंतर त्याची पॅकिंग डेट पाहिली असता, ते 1969 सालचे असल्याचे आढळून आलं. 1970 च्या दशकात कोणी तरी चिप्सचं पाकिट विकत घेतलं आणि उद्यानात तसंच सोडलं. ते अजूनही उद्यानात तसंच होतं. हे चिप्सचं पाकिट आपल्या जन्मापूर्वीचं असल्याचं शेरॉनने सांगितलं. हे चिप्सचे पाकिट संग्रहालयात ठेवण्यासारखं आहे. म्हणून त्याची फ्रेम करण्याचं दोघांनी ठरवलं आहे. या पाकिटाचा दर्जा अत्यंत चांगला असल्याने 50 वर्षांनंतरही ते जसंच्या तसं होतं. यावरून ही गोष्ट पुन्हा अधोरेखित होते, की प्लास्टिक नष्ट होत नाही. प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरण किती धोक्यात आहे, हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
First published:

Tags: Photo viral

पुढील बातम्या