मुंबई : सोशल मीडियावर मधल्या काही काळात कपलचे सार्वजनीक ठिकाणी रॉमान्स करत असतानाचे अनेक व्हिडीओ समोर आले होते. यांपैकी काही कपलवर व्हिडीओ व्हायरल होताच कारवाई करण्यात आली, तर काही कपलला प्रसिद्धीही मिळाली. सध्या असाच एक व्हिडीओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे, ज्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ समोर येताच त्याने खळबळ उडवून दिली. हा व्हिडीओ पुण्याचा असल्याचं सांगितलं जात आहे.
ट्रेनमध्ये कपलच्या अश्लीलतेच्या सगळ्याच मर्यादा पार, सर्वांसमोर ठेवू लागले शरिर संबंध
या व्हायरल व्हिडीओमध्ये तरुण तरुणी रस्त्याच्या मधोमध एकमेकांना मिठी मारत आहेत. बऱ्याच काळापासून ते तिथून बाजूला होत नव्हते, त्यामुळे लोकांची गर्दी जमली. सिग्नलवर गाड्या थांबलेल्या असल्यामुळे त्यांनी एकमेकांना मिठी मारली, पण नंतर सिग्नल सुटला तरी ते काही हटत नव्हते. अखेर ट्राफीक पोलिसांना मधे पडावं लागलं आणि त्यांना तेथून हटवावं लागलं.
पुणे शहरात हे काय सुरु आहे, भररस्त्यात दोघांचा बिनधास्त रोमान्स#Pune #ViralVideo #Love pic.twitter.com/xuWPJbLDhh
— jitendra (@jitendrazavar) March 31, 2023
ट्राफीक पोलिसांनी कपलला शिटी मारली, पण ते बाजूला झालेच नाहीत अखेर कपलच्या जवळ जात त्यांना कपलला तेथून हटण्यासाठी सांगितले. तोपर्यंत तिथे अनेक नागरिक जमले होते. अखेर कपल तेथून बाजूला झाले.
या व्हिडीओवर लोकांनी जोरदार कमेंट्स केल्या आहेत. तसेच या व्हिडीओला लाईक्स देखील मिळाल्या आहेत. कमेंटमध्ये एका युजरे लिहिलं की ट्राफीक पोलिसाने स्वप्नात देखील विचार केला नसावा की त्याला कधी शिट्टीचा अशापद्धतीने वापर करावा लागला असेल. तर काहींनी पुणे तिथे काय उणे यासारख्या विविध कमेंट्स केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Couple, Pune, Romance, Shocking, Top trending, Videos viral, Viral