• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • हद्दच झाली! '....तरच जेवण मिळणार'; लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठी कपलनं ठेवला अजब नियम

हद्दच झाली! '....तरच जेवण मिळणार'; लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठी कपलनं ठेवला अजब नियम

एका कपलनं लग्नात येणाऱ्या पाहुण्यांकडे एक लिस्ट दिली. यात गिफ्टचे काही रेट आणि क्लास दिले गेले होते

 • Share this:
  नवी दिल्ली 11 सप्टेंबर : लग्नातील किस्से (Wedding News) अगदी वेगळे आणि मजेशीर असतात. काही किस्से अगदी जगभरात प्रसिद्ध होतात तर काही कित्येक वर्ष लक्षात राहतात. अनेकजण लग्नात पाहुण्यांना (Wedding Guests) कोणतीही भेटवस्तू आणू नका, असं वारंवार सांगत राहतात. काही लोक गिफ्टच्या (Gift Cost) बाबतीत आपली पसंत सांगतात तर काही हद्दच करतात. सध्या लग्नातील एक अशीच विचित्र घटना (Weird News) समोर आली आहे. अचानक GF घरी आल्यानं तरुणाने दुसरीला अर्धनग्न अवस्थेतच बाल्कनीत लटकवलं अन्... मिररनं दिलेल्या वृत्तानुसार, एका कपलनं लग्नात येणाऱ्या पाहुण्यांकडे एक लिस्ट दिली. यात गिफ्टचे काही रेट आणि क्लास दिले गेले होते. जे पाहुणे ज्या कॅटेगिरीतलं गिफ्ट आणतील, त्याचनुसार त्यांना जेवण मिळेल, असं यात सांगण्यात आलं. ही बातमी आणि कृत्य अतिशय विचित्र आहे. या कपलनं फूड मेन्यूसोबत गिफ्ट रेट तयार केला होता. यावर पाहुण्यांनी गिफ्ट रेटवर सर्कल केलं होतं. जे ते कपलच्या लग्नात आणणार होते. सोबतच लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना आपल्या आवडीचं जेवण निवडण्याचीही परवानगी आहे. या कपलसाठी 18 हजाराचं गिफ्ट लव्हिंग कॅटेगिरीमध्ये येतं. हे पाहुणे रोस्ट चिकन किंवा स्वॉर्डफिशमधील काहीही निवडू शकतात. स्वतःचा DNA रिपोर्ट पाहून हादरली तरुणी; 19 वर्षांनी झाला धक्कादायक खुलासा यासोबतच वेगवेगळ्या किमतीचे गिफ्ट, सिलव्हर, गोल्डन आणि प्लॅटिनम कॅटेगिरीमध्ये ठेवली जातात. मात्र, चांगल्या जेवणासाठी पाहुण्यांना गिफ्टही चांगल्या किमतीचं आणावं लागेल.
  Published by:Kiran Pharate
  First published: