मुंबई, 14 सप्टेंबर : जगभरात कोरोनाचा प्रकोप होत आहे. वारंवार मास्क घाला सोशल डिस्टन्सिंग बाळगा हे सांगूनही अनेकदा नागरिक त्याचं पालन करत नाहीत. मास्क लावण्याऐवजी तो गळ्यावर लटकवला जातो. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून माणूसच नाही तर प्राणीही जागृत होत असल्याचे व्हिडीओ अनेक वेळा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
प्राण्यांना कळतंय पण माणसाला कळून वळत नाही. असाच एक प्रकार घडला. पार्कमध्ये एक महिला मास्क तोंडावर न लावता गळ्यात अडकवून हंसासोबत खेळायला गेली. हंसानं मात्र या महिलेला मास्क न लावल्यामुळे अद्दल घडवली आहे. या महिलेला मास्क योग्य पद्धतीनं न घातल्याचा धडा मिळाला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
खोकलं किंवा शिंकलं तरी कुत्रा किंवा मांजर मास्क वर करत असल्याचे अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाले होते. इतकच नाही तर कोरोना होऊ नये म्हणून काही जणांनी प्राण्यांनाही मास्क लावल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशा परिस्थित प्राणी जागृक झाले आहेत. या हंसानं महिलेला मास्क न घातल्यानं मारलं आणि तिचा मास्क तोंडावर आणला.
हा व्हिडीओ एक संदेश देणारा आहे. माणसांना नाही पण प्राण्यांना कळतंय. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळायचा असेल तर मास्क नीट वापरायला हवा आणि सोशल डिस्टन्सिंग बाळगायला हवं. IFS सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 24 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे.