फूड डिलिव्हरी करणारी महिलाच निघाली चोर, नेमका काय घडला प्रकार पाहा CCTV VIDEO

फूड डिलिव्हरी करणारी महिलाच निघाली चोर, नेमका काय घडला प्रकार पाहा CCTV VIDEO

सेफ डिलिव्हरी करण्यासाठी बऱ्याचवेळा घराबाहेर पार्सल ठेवून जाण्यासाठी कर्मचाऱ्याना सांगितलं जातं याचाच फायदा एका महिला डिलिव्हरी गर्लनं घेतला आहे.

  • Share this:

मुंबई, 05 ऑक्टोबर: कोरोना महासंकटात अनेकजण घरी सुरक्षित राहून जेवणाची किंवा वस्तूची ऑर्डर करत असल्यानं ऑनलाइन ऑर्डरचं प्रमाण खूप वाढलं आहे. कोरोना काळात हातात किंवा कॉन्टॅक्टमध्ये न येता सेफ डिलिव्हरी करण्यासाठी बऱ्याचवेळा घराबाहेर पार्सल ठेवून जाण्यासाठी कर्मचाऱ्याना सांगितलं जातं याचाच फायदा एका महिला डिलिव्हरी गर्लनं घेतला आहे.

एका डिलिव्हरी गर्लनं घराबाहेर खाद्यपदार्थाची डिलिव्हरी केली. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी दाराबाहेर पाकीट ठेवलं आणि डिलिव्हरी झाली हे दाखवण्यासाठी तिने त्याचा फोटो देखील काढला. मात्र पुढे जे काय घडलं ते पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही. या तरुणीनं फूड डिलिव्हर्ड असा पर्याय क्लिक केला आणि त्यानंतर स्वत: हे पार्सल घेऊन फरार झाली. आपल्याला कोणी पाहात नाही हे बघत तिने पार्सल लंपास केलं आहे.

हे वाचा-वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तरुणाची उंटानं मोडली खोड, नेमकं काय घडलं पाहा VIDEO

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. डेली डॉटच्या म्हणण्यानुसार, फुटेज TikTok युजर @ @barbeed0ll यांनी पोस्ट केले होते, ज्यांनी सांगितले की त्यांनी अमेरिकेत डोरडॅश या फूड डिलिव्हरी करणाऱ्या सेवाद्वारे ऑर्डर दिली होती. व्हिडीओ पोस्ट करत त्या महिलेने लिहिले की, 'तुम्हाला काय वाटते कॅमेरे अस्तित्त्वात नाहीत? पण हा व्हिडीओ पाहून डोअरडॅश नक्कीच या कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकेल आणि योग्य ती कारवाई करेल असा माझा विश्वास आहे असं व्हिडीओ पोस्ट करणाऱ्यानं म्हटलं आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 5, 2020, 11:07 PM IST
Tags:

ताज्या बातम्या