रस्त्यावर फिरणाऱ्या 'या' डायनासॉरला पाहून पोलिसांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO

रस्त्यावर फिरणाऱ्या 'या' डायनासॉरला पाहून पोलिसांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO

डायनासॉरचे ड्रेस घातलेला हा व्यक्ती रस्त्यांवर फिरतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 21 मार्च : चीन, इटली, स्पेन पाठोपाठ भारतातही कोरोनाचा धोका वाढत आहे. जगभरात आतापर्यंत 11 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात 250 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊन आणि कर्फ्यूचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतातही रविवारी जनता कर्फ्यू लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीनं काळजी घेत आहे. पण हा धोका टाळण्यासाठी अजब प्रकार एका व्यक्तीनं केल्याचं समोर आलं आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून चक्क एका व्यक्तीनं डायनासॉरचा ड्रेस घातला आणि रस्त्यावर फिरत होता. हे पाहून पोलिसांचीही घाबरगुंडी उडाली. डायनासॉरचे ड्रेस घातलेला हा व्यक्ती रस्त्यांवर फिरतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हा माणून घरी बसून कंटाळला होता. कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी त्यानं डायनॉसोरचा ड्रेस घालून कचरा टाळण्याच्या बहाण्यानं बाहेर आला त्याला पाहून पोलीसही घाबरले आणि पळून गेले. मात्र नंतर पोलिसांनी या माणसाला पकडून समजवलं आणि घरी सोडून दिलं. या माणसावर कारवाई करण्याऐवजी त्यांनी समजवून त्याला घरी पोहोचवलं. ट्विटरवर हा डायनॉसोरचा ड्रेस घालून व्यक्ती कुत्र्याला फिरवत असल्याचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता. पोलिसांनी आपल्या अकांऊटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ स्पेनमधील असल्याची माहिती मिळत आहे.

First published: March 21, 2020, 2:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading