मुंबई, 04 फेब्रुवारी: काळजाला भिडणारा आणि डोळ्यात पाणी येईल असा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असं म्हणतात की शेवटच्या श्वासापर्यंत अपार प्रेम करणारा जोडीदार मिळावा. पण जगायचं तर एकमेकांसाठी आणि शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांसाठी जीव असेल, अशी शपथ घेतलेल्या या जोडीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांचं अपार प्रेम पाहून युझर्सच्या डोळ्यात पाणी आलं आहे.
शेवटच्या क्षणी 80 वर्षांच्या असणाऱ्या या वृद्धी जोडीनं एकमेकांच्या हातात हा घेत अखेरचा श्वास सोडला. दोघंही कोनोरा वायरने ग्रासले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. दोघांनी शेवटच्या क्षणी एकमेकांच्या हातात हात घेऊन श्वास सोडला. रुग्णालयात त्यांच्यासोबत उपस्थित असणाऱ्यांच्या कॅमेऱ्यात हा भावुक क्षण कैद झाला आहे. हा व्हिडिओ टीक-टॉक, फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपवर शेअर करण्यात येत आहे. काळजाला भिडणारा हा व्हिडिओ पाहून युझर्सलाही अश्रू अनावर झाले आहेत.
What does a couple mean? Two elderly patients of #coronavirus in their 80s said goodbye in ICU, this could be the last time to meet and greet 😭😭😭 pic.twitter.com/GBBC2etvV9
ट्विटर युझर जियांग नावाच्या तरुणानं हा व्हिडिओ 3 फेब्रुवारीला अपलोड केला आहे. या व्हिडिओला 27 जारहून अधिक लाईक्स, 14 हजारहून जास्त वेळा रिट्वीट करण्यात आला आहे.
चीनमध्ये कोरोना वायरसनं मोठा धुमाकूळ घातला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जागतिक आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत चीनमध्ये 300हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 15 हजारहून अधिकांना याची लागण झाली आहे.