Home /News /viral /

VIDEO : वा उस्ताद! पोपटानं गायलं गाणं, गिटारसोबत पोपटाची धमाल

VIDEO : वा उस्ताद! पोपटानं गायलं गाणं, गिटारसोबत पोपटाची धमाल

पोपटाच्या गाण्याचा व्हिडीओ 92 हजार लोकांनी पाहिला असून 2 हजारहून अधिक लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत.

    मुंबई, 10 जून : मित्रांच्या ग्रूपमध्ये गिटार वादकाला मोठा आदर असतो. मात्र फक्त मित्रांचाच ग्रूप नाही तर आता पोपटांच्या गटातही हा तरुण खूप प्रसिद्ध झाला आहे. या तरुणानं गिटार वाजवल्यानंतर पोपटनं चक्क गाणं गायलं आहे. लॉकडाऊनमध्ये बरेचजण घरी असल्यानं आपला छंद जोपासत आहेत. असाच तरुण गिटार वाजवत असताना खिडकीमध्ये पोपटांनी गर्दी केली. त्यातला एक पोपट या गिटारच्या धूनवर गाणं गायला लागला. या तरुणासोबत गाणं धमाल गाणं गात असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. Jatin Talukdar नावाच्या तरुणानं हा व्हिडीओ आपल्या फेसबुकला शेअर केला आहे. आतापर्यंत पोपटाच्या गाण्याचा व्हिडीओ 92 हजार लोकांनी पाहिला असून 2 हजारहून अधिक लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. संगीत हे केवळ माणसांनाच नाही तर प्राणी आणि पक्षांनाही तेवढंच प्रिय असतं हे या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. हा तरुण खिडकीजवळ बसून गिटार वाजतवत असताना दोन पोपट त्याच्या जवळ येतात. त्यातील एक गिटारच्या धूनवर आपलं गाणं हळूहळू म्हणायला सुरुवात करतो. पोपटांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे. हे वाचा-...तर पावसाळ्यात 5 पट जास्त होणार कोरोनाचा प्रसार! IIT चा भीती वाढवणारा रिसर्च हे वाचा-तीर्थ समजून प्यायला सॅनिटाझर, सुनील ग्रोवरने शेअर केला VIDEO संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Viral video.

    पुढील बातम्या