Coronavirus ची भीती जावून चेहऱ्यावर येईल हसू, पाहा पक्ष्यांचा VIRAL VIDEO

Coronavirus ची भीती जावून चेहऱ्यावर येईल हसू, पाहा पक्ष्यांचा VIRAL VIDEO

सध्या कोरोनामुळे असलेली परिस्थिती, ओढावलेल्या संकटाचा सामना कऱण्यासाठी या व्हिडिओतून नक्कीच प्रेरणा मिळेल.

  • Share this:

मुंबई, 21 मार्च : कोरोना व्हायरसमुळे लोक प्रचंड भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. मात्र यातही काही लोक लहान लहान गोष्टींमधून आनंद शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. देश-विदेशात लॉकडाउन झालेले लोक गॅलरीत येऊन गाणी गात असलेले व्हिडिओ व्हायरल झाले होते. आताही एका ट्विटर युजरनं एक व्हिडिओ शेअऱ केला असून त्यात म्हटलं आहे की, आनंद एक दिशा दाखवतो. त्यासाठी जागा बघत नाही.

सध्या कोरोनामुळे असलेली परिस्थिती, ओढावलेल्या संकटाचा सामना कऱण्यासाठी या व्हिडिओतून नक्कीच प्रेरणा मिळेल. चिमण्यांचा थवा जे करतो त्यातून आपल्या चेहऱ्यावर हास्य तर येईलच पण त्यांच्याकडून शिकताही येईल.

समुद्र किनाऱ्यावर एक चिमण्यांचा थवा बसला असल्याचं दिसतं आहे. जशी समुद्राची लाट येते सर्वच पक्षी वेगानं बाजूला होतात. या चिमण्यांप्रमाणे आपणही स्वत:ला या आजारापासून दूर ठेवलं पाहिजे. भीतीदायक वातावरणात तुमच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू नक्की येईल.

देशात कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून पावलं उचलली जात आहेत. आतापर्यंत 258 जणांना संसर्ग झाला आहे. शुक्रवारी देशात कोरोना झालेल्यांची संख्येत सर्वाधिक वाढ झाली. एका दिवसात कोरोनाची 63 प्रकरणं समोर आली. आतापर्यंत कोरोनामुळे जगभरात 11 हजार जणांचा जीव गेला आहे.

हे वाचा : रस्त्यावर फिरणाऱ्या 'या' डायनासॉरला पाहून पोलिसांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO

First published: March 21, 2020, 5:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading