पुणे, 18 मार्च : कोरोनाव्हायरसच्या भयाने शहरांमधली गर्दी कमी होत असताना लोकांमध्ये जागरुकताही मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं दिसून येत आहे. Coronavirus च्या संशयित रुग्णाला कशा पद्धतीने संसर्ग टाळून आयसोलेशन किंवा क्वारंटाइन वॉर्डपर्यंत नेण्यात येतं, हे दाखवणारा पुणे रेल्वे स्टेशनवरचा एक व्हिडीओ बुधवारी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ स्टेशनवरच्या बघ्यांपैकीच कुणीतरी काढला असावा. याची वैधता News18 ने अद्याप तपासलेली नाही. पण काही तासांतच सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर झाला. या व्हिडीओत स्टेशनमधून बाहेर येताना एक महिला दिसत आहे आणि तिला घेऊन जाण्यासाठी एक अँब्युलन्स स्टेशनबाहेर सज्ज असलेली दिसते. संसर्ग टाळण्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी पूर्ण बंद असलेला लॅब कोट आणि मास्क लावलेले दिसत आहेत. तिथे उपस्थित असलेले पोलीससुद्धा लोकांना गर्दी टाळण्याचं आवाहन करत असलेले दिसतात. या संशयित रुग्ण असलेल्या महिलेच्या संपर्कात कुणी येऊ नये याची पुरेपूर दक्षता प्रशासन घेताना दिसून येत आहे.
कोरोनाला हरवण्यासाठी महाराष्ट्र सज्ज, आरोग्यमंत्र्यांनी केल्या 5 मोठ्या घोषणा
पुण्यात रेल्वेने आलेल्या या महिलेला रुग्णवाहिकेतून नायडू हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं असल्याची माहिती मिळते. तिला पाहायाल मोठी गर्दी जमा झाली होती. रेल्वेमधून उतरल्यावर स्टेशनवरील गर्दी पोलिसांनी बाजूला केली. ही महिला नेमकं कुठून आली याबाबत माहिती समजू शकली नाही. ही कोरोनासंशयित रुग्ण असावी, असा अंदाज आहे.
Pune station, corona #COVID19 patient taken in custody by doctors! Salute to those officers, doctors who are responsibly and delicately handling this situation! 🙏🏻 pic.twitter.com/HGrmKaoQOc
— नुपुर अहिरे. (@Nupur_Ahire) March 18, 2020
सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणांचं कौतुक होत आहे. प्रसार टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेत असल्याचं यूजर्सनी म्हटलं आहे.
कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार अधिकाधिक कडक उपाययोजना करत आहे. परदेशातून येणाऱ्या संशयित कोरोनाव्हायरसच्या रुग्णांना होम क्वारंटाइन करण्याचे आदेश दिले गेले आहेत. सर्वसामान्य नागरिकांमध्येही याबाबत जागरुकता निर्माण व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.
अन्य बातम्या
महाराष्ट्रात 'देऊळ बंद', पण प्रसिद्ध हाजी अली दर्गा ट्रस्टचा अजब निर्णय
कोरोनाबाधित इटलीतून मुंबईच्या मुलीची सुटका, वडिलांनी मोदींना म्हटलं ‘बापमाणूस’