हे वाचा-लेकाला खांद्यावर घेत बापानं केला 500 किमी पायी प्रवास, पण घरी पोहचल्यानंतर... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या आधी 21 दिवसांचा लॉकडाऊन केला होता. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं हा लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. प्रत्येक राज्यानं आपल्या स्तरावर 20 एप्रिलनंतर लॉकडाऊनचे नियम शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हॉटस्पॉट असणाऱ्या ठिकाणांसाठी 3 मेपर्यंत लॉकडाऊनचे नियम काटोकोरपणे पाळण्यात येणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. तर टिकटॉकवरचा यासंदर्भात हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार 15 तासांमध्ये कोरोनामुळे 37 जणांचा मृत्यू झाला असला तरीही दिलासा देणारी बाब म्हणजे 610 जणांनी कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वीपणे दिला आहे. सध्या देशात 15 हजार 474 रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत देशात एकूण 19 हजार 984 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हे वाचा-Jio मध्ये Facebook सर्वात मोठा भागीदार, वाचा या करारातील 8 महत्त्वाच्या गोष्टी संपादन- क्रांती कानेटकर@odamrsanjay3 Mai ko Modi ji FIR aaenge##ownvoice ##dihatyfunnyboy ##funnyvideos ##tiktok_india ##foryoupage ##tiktok_india ♬ original sound - O D A MrSanjay
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.