Home /News /viral /

क्वारंटाइन सेंटरमध्ये उमटले मंत्रमुग्ध करणारे बासरीचे सूर, पाहा थक्का करणारा VIDEO

क्वारंटाइन सेंटरमध्ये उमटले मंत्रमुग्ध करणारे बासरीचे सूर, पाहा थक्का करणारा VIDEO

बासरीची धून ऐकून क्वारंटाइन सेंटरमधील इतर रुग्णांनी त्यावर ठेका धरला, पाहा VIDEO

    मुंबई, 24 जुलै: देशात कोरोनाचं थैमान सुरू आहे. जवळपास दिवसाला 40 ते 45 हजार नवीन रुग्णांची नोंद होत आहे. अशीवेळी कोरोनामुळे आलेली भीती आणि नैराश्य घालवण्यासाठी क्वारंटाइन सेंटर आणि रुग्णालयातील अनेक डॉक्टरांचे किंवा रुग्णांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कुणी योगा करून तर कुणी डान्स करून तर कुणी गाणी म्हणून रुग्णांना सकारात्मक ऊर्जा देण्याचा प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वी रुग्णालयात पीपीई कीट घालून डॉक्टरांचा डान्स तुफान व्हायरल झाला होता. आता क्वारंटाइन सेंटरमध्ये कोरोना रुग्णानं सुंदर बासरी वाजवली आहे. आसाम मधील क्वारंटाइन सेंटरमधला हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे वाचा-VIDEO : एक्स बॉयफ्रेंडचा बदला घेण्यासाठी तरुणीनं जाळली कार आणि... या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता एका तरुणानं मंत्रमुग्ध करणारी बासरी वाजवली आहे. या बासरीची धून ऐकून तिथल्या इतर रुग्णांना राहावलं नाही. त्यांनी टाळ्यांची साथ दिली आणि पाहाता पाहाता क्वारंटाइन सेंटर संगीतमय होऊन गेलं. दोन तरुणांनी या बासरीवर छान ठेका धरला आणि डान्स केला. कोरोनामुळे मनात असलेली भीती आणि ताण घातलवण्यासाठी हा उत्तम पर्याय असल्याचं सोशल मीडियावर अनेक युझर्सनी म्हटलं आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युझर्सनी क्वारंटाइन सेंटरमध्ये राहणाऱ्या रुग्णांसाठी लवकर बर होण्यासाठी प्रार्थना केली आहे. क्वारंटाइन सेंटरमधला हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Viral video.

    पुढील बातम्या