Home /News /viral /

घरातून LIVE करत होती अँकर, पाठीमागून शर्ट न घालता आले बाबा... पाहा VIDEO

घरातून LIVE करत होती अँकर, पाठीमागून शर्ट न घालता आले बाबा... पाहा VIDEO

सोशल मीडियावर अँकरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये अँकर Live करत असतानाच तिचे बाबा शर्ट घालतच येत असल्याचं दिसतात.

    फ्लोरिडा, 03 एप्रिल : कोरोनामुळे सध्या अनेक कंपन्यांचे काम वर्क फॉम होम सुरु आहे. कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरात बसूनच काम करण्यास सांगितलं आहे. यामध्ये काही न्यूज एजन्सींनीसुद्धा त्यांचे पत्रकार, कंटेटं रायटर्स, अँकर यांना घरातून काम करण्याची मुभा दिली आहे. एरवी स्टुडिओमध्ये सेट असतो. त्याशिवाय मेकअप, कपडे, लाइट इत्यादी सगळं कसं नेटकं असतं. पण घरातून काम करताना अँकर्सना आहे त्यामध्ये कॅमेरा सेट करणं, पुन्हा आजुबाजुच्या वातावरणाचा अंदाज घेऊन ते शूट कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण करायचं असतं. सध्या सोशल मीडियावर अँकरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये अँकरचे बाबा अचानक शर्ट घालतच येत असल्याचं दिसतात. फक्त 5 सेकंदाचा हा व्हि़डिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. लाइव टीव्हीवर रिपोर्टिंग सुरु असतानाच अँकरचे बाबा येतात. फ्लोरिडातील जेसिका लँग ही सनकोस्ट न्यूज नेटवर्कमध्ये रिपोर्टर आहे. जेसिका तिच्या किचनमध्ये उभा राहून कोरोना व्हायरसशी संबंधित शूट करत होती. त्याचवेळी तिचे बाबा शर्ट घालतच बाहेर येताना कॅमेऱ्यात दिसतात. हे सर्व शूट तिची आई करत होती. बाबा अशा अवस्थेत येताना दिसताच जेसिका थोड्या रागाच्या स्वरातच, Dad असं म्हणते.+ हे वाचा : जगातले 9 असे देश जिथं अजुन Coronavirus पोहोचला नाही, एक तर चीनचा सख्खा शेजारी ट्विटरवर जेसिकाने हा व्हिडिओ शेअर केला आहे. रविवारी हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. त्यावर अनेकांनी वडिलांचंही कौतुक केलं आहे. घरातून काम करताना असे अनुभव येतीलच असंही काहींनी म्हटलं आहे. पाहा VIDEO कोरोनाला रोखण्यासाठी नागपूरच्या डॉक्टरने तयार केला ‘सेफ्टी बॉक्स'
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या