Fact Check : खरंच कोरोना व्हायरस पृथ्वीवरून निघून जात आहे?

Fact Check :  खरंच कोरोना व्हायरस पृथ्वीवरून निघून जात आहे?

जगभरात कोरोनानं हाहाकार माजलेला असताना मात्र आता चीनमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात सरकारला यश येत आहे.

  • Share this:

मुंबई, 23 मार्च : जगभरात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू आहे. 11 हजारहून अधिक लोक कोरोनामुळे मृत्युमुखी झाले आहेत. भारतात आतापर्यंत 324 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जगभरात कोरोनानं थैमान घातलं असताना लोकांच्या मनात भीती असतानाच आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ चीनमधील असल्याचं सांगितलं जात आहे. जगभरात कोरोनानं हाहाकार माजलेला असताना मात्र आता चीनमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात सरकारला यश येत आहे. त्यातच हा व्हिडीओ व्हायरस झाल्यामुळे तिथल्या लोकांना दिलासा मिळाला आहे.

हा व्हायरल व्हिडीओ पाहा, यामध्ये एक ड्रॅगन आपल्याला आकाशात जाता जाता लुप्त होताना दिसतो. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. हा ड्रॅगन म्हणजे कोरोना व्हायरसचा विषाणू असल्याचं तिथल्या लोकांची श्रद्ध आहे. हा विषाणू आता पृथ्वीवरून जात असल्याची श्रद्धा तिथल्या लोकांनी व्यक्त केली आहे.

हा व्हिडीओ 800हून अधिक लोकांनी पाहिला आहे. मात्र खरंच हा व्हिडीओ खरा आहे का यासंदर्भात युझर्सनी अनेक चर्चा केल्या. हा व्हिडीओ ग्राफिक्सचा वापर करून तयार केल्याची माहिती समोर आली आहे. हा व्हिडीओ फेक असून एका अॅपवर एडिट करण्यात आला आहे. त्यामुळे अशा कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी आणि त्याचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी भारताने तयारी सुरू केली आहे. यासाठी सर्व राज्यांमधील शाळा, कॉलेज, ऑफिसं बंद करण्यात आली आहेत. मात्र कोणत्याही शहरात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले नव्हते. आता राजस्थान संपूर्ण लॉकडाऊन घोषित करणारं पहिले राज्य ठरले आहे. तर जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतातही अनेक ठिकाणी लॉकडाऊनच्या दिशेनं पावलं उचलली जात आहेत.

First published: March 23, 2020, 11:03 AM IST

ताज्या बातम्या