Home /News /viral /

VIDEO : रिक्षा चालकाचा हायवोल्टेज ड्रामा, दारू पिऊन रस्त्यात आत्मदहनाचा प्रयत्न

VIDEO : रिक्षा चालकाचा हायवोल्टेज ड्रामा, दारू पिऊन रस्त्यात आत्मदहनाचा प्रयत्न

कोरोनाच्या काळात धंदा बंद झाला आणि घरभाड्यासाठी मालकही त्रास देऊ लागल्यानं उचललं धक्कादायक पाऊल.

    मंडी, 29 जुलै: रिक्षा चालकानं दारू पिऊन धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मद्यधुंद अवस्थेत हा तरुण आत्महत्या करण्यासाठी रस्त्यावर बसून होता. रस्त्यावर दोन्ही बाजूनं वेगानं गाड्या येत असताना हा तरुण रस्त्यात ठाण मांडून बसला होता. रिक्षा चालकाचा धिंगाणा पाहून वाहतूक पोलीस आणि पोलिसांनी या तरुणाला तातडीनं ताब्यात घेतलं. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही घटना मंगळवारची असल्याचं सांगितलं जात आहे. हे वाचा-आता त्रास सहन होईना, कर्वेनगरमध्ये वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या; पुणे हादरलं! मंडी शहरातील एका रिक्षा चालकाने मंगळवारी (28 जुलै) दारूच्या नशेत आपला वाहन रस्त्याच्या कडेला लावलं. त्यानंतर पेट्रोलची रिक्षाची टाकी उघडून त्यामध्ये तेल टाकण्याचा प्रयत्नात असलेल्या रिक्षा चालकाचा आत्मदहनाचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. पोलिसांनी तातडीनं त्याला ताब्यात घेतलं. ही संपूर्ण घटना हिमाचल प्रदेशातील मंडी इथल्या बाजारात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लॉकडाऊनमुळे काम बंद होते आणि त्यामुळे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे घरमालकानं खोली खाली करण्याचा तगादा लावला. या धमकीला कंटाळून रिक्षा चालक आत्मदहन करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र वाहतूक पोलिसांनी वेळीच या रिक्षा चालकाला ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केलं आणि मोठा अनर्थ टळला.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Lockdown, Viral video.

    पुढील बातम्या