पैसे मिळवण्यासाठी काकांना मास्कचा असा केला जुगाड, PHOTO पाहून युझर्स झाले हैराण

पैसे मिळवण्यासाठी काकांना मास्कचा असा केला जुगाड, PHOTO पाहून युझर्स झाले हैराण

बँकेत गेलेले काका विसले मास्क, कॅशियरसमोर असा केला जुगाड

  • Share this:

मुंबई, 11 सप्टेंबर : देशभरात कोरोनाचा विस्फोट होत आहे. प्रत्येक दिवसाला जवळपास 90 हजाराच्या आसपास रुग्ण आढळत असताना हा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचं काटेकोरपणे पालन केलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. बऱ्याचवेळा गडबडीत मास्क घरीच विसरला जातो किंवा असून देखील आपण नीट वापरत नाही. अशावेळी मग गरजेला जुगाड केले जातात आणि हे जुगाड तर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात.

सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी भारतातच नाही तर जगभरात वेगवेगळे जुगाड होत आहेत. कुठे टेडीबिअर, तर कुठे छत्र्या तर कुठे डोक्यावर टोपी अशा वेगवेगळ्या तऱ्हा वापरून सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात आहे. पण जेव्हा मास्कचं विसरतात आणि अशा ठिकाणी आठवण होते जिथे मास्क खरेदी करणंही शक्य नसतं त्यावेळी काय गमती-जमती आणि जुगाड होतात त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे वाचा-झूमवर क्लास सुरू असतानाच तरुणीच्या घरात घुसले चोर, लॅपटॉप बंद केला आणि...,

IPS पंकज यांनी हा फोटो शेअर केला आहे. हा व्यक्ती विना मास्कचा पैसे घेण्यासाठी आला त्यावेळी मास्क कुठे अशी विचारणा केली. मास्क नाही तर पैसेही नाही असं कॅप्शन देऊन पंकज यांनी हा फोटो शेअर केला आहे. पैसे घेण्यासाठी ही व्यक्ती अखेर आपल्या कुर्त्याला मास्क बनवते हा जुगाड सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोला आतापर्यंत हजारहून अधिक लोकांनी पाहिलं असून 900 हून अधिक लोकांनी लाईक केलं आहे.

हे वाचा-VIDEO: पाण्यात पाय टाकताच समोर होता 14 फूटी लांब शार्क आणि...

एकाच दिवसात तब्बल 96 हजार 551 नवीन रुग्णांची नोंद झाली. नवीन कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता लवकरच देशात 1 लाख रुग्ण संख्याही नोंदवली जाऊ शकते. एवढेच नाही तर आज 1209 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 45 लाख 62 हजार 414 झाली आहे.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या 9 लाख 43 हजार 480 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 76 हजार 271 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 35 लाख 42 हजार 663 लोकं निरोगीही झाले आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 12, 2020, 12:18 PM IST

ताज्या बातम्या