खरं की खोटं : इतर देशांपेक्षा भारतात Coronavirus ची टेस्ट महाग?

खरं की खोटं : इतर देशांपेक्षा भारतात Coronavirus ची टेस्ट महाग?

चीन अमेरिकेसह युरोपातील देश कोरोना व्हायरची टेस्ट फ्रीमध्ये करत असताना भारतात मात्र यासाठी पैसे मोजावे लागत असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 27 मार्च : कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात 20 हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 5 लाख लोकांना कोरोना झाला आहे. साथीच्या या रोगाने जगाला विळखा घातला आहे. यावर लस शोधण्याचं आणि कोरोनाचं निदान करण्यासाठी तपासणीचे किट तयार करण्याचंही आव्हान संशोधकांसमोर आहे. दरम्यान, फेसबुकवर एक मेसेज व्हायरल होत आहे त्यात दावा करण्यात आला आहे की, इतर देशात कोरोना व्हायरची टेस्ट फ्री किंवा नाममात्र पैशात केली जात आहे. मात्र भारतात यासाठी मोठी रक्कम मोजावी लागत आहे.

फेसबुकसह व्हॉटसअॅपवर ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यात म्हटलं आहे की, चीन, अमेरिकेसह युरोप, इराण, श्रीलंका या देशांमध्ये कोरोनाची टेस्ट फ्रीमध्ये केली जात आहे. बांगलादेशमध्ये 300 रुपये, पाकिस्तानात 500 तर भारतात मात्र 4500 रुपये द्यावे लागत आहेत.

व्हायरल पोस्टमध्ये कऱण्यात येत असलेला दावा आणि प्रत्यक्षात बरीच तफावत आहे. भारतातील सरकारी रुग्णालय आणि टेस्ट सेंटरमध्ये कोरोनाची टेस्ट फ्रीमध्ये केली जात आहे. फक्त खाजगी दवाखान्यांमध्ये टेस्ट करण्यासाठी पैसे घेतले जात आहे. भारताशिवाय इतर देशांबाबत पोस्टमध्ये देण्यात आलेली माहितीही चुकीची आहे.

चीनमध्ये सुरुवातील कोरोनाची टेस्ट करण्यासाठी पैसे घेतले जात होते. एका रुग्णासाठी 370 युआन म्हणजेच 4 हजार रुपये मोजावे लागत होते. तर अमेरिका आणि युरोपात कोरोना व्हायरसच्या टेस्टिंगसाठी यंत्रणा अपुरी पडत होती. त्यामुळे खाजगी लॅब, क्लिनिक यांनी अनेक रुग्णांकडून मोठी रक्कम उकळली.

अमेरिकेत तर कोरोनाची टेस्ट करत असताना त्याची फी ही कोणाकडे कोणती विमा पॉलिसी आहे हे ठरवून घेतली जात होती. यानुसार ही फी 2700 ते 3900 रुपयांपर्यंत घेतली जात होती. हे पैसे विमा कंपन्या देत असल्यानं त्यांना रुग्णांकडून पैसे घेतले जात नव्हते. दरम्यान, श्रीलंकेच्या सरकारने खाजगी दवाखान्यांना कोरोनाची टेस्ट करण्यास परवानगी दिली आहे. यात ते कोरोना व्हायरसच्या टेस्टसाठी जास्ती जास्त 6 हजार रुपयांपर्यंत फी घेऊ शकतात.

हे वाचा : कोरोनामुळे वाढदिवस ठरला स्पेशल, 8 वर्षीय चिमुकलीचा 18 सेकंदाचा VIDEO VIRAL

भारताबाबत पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, या टेस्टसाठी 4500 रुपये मोजावे लागतात. मात्र भारतातील सरकारी रुग्णालये आणि प्रयोगशाळांमध्ये कोरोनाची टेस्ट मोफत केली जात आहे. मात्र यात फक्त संभाव्य धोकादायक प्रकरणांची टेस्ट केली जात आहे. जर एखाद्याची ट्रॅव्हल हिस्ट्री आहे किंवा कोणी त्यांच्या संपर्कात आला असेल तरच. मात्र सरकारी यंत्रणेवर पडत असलेला ताण कमी करण्यासाठी NABL मान्यताप्राप्त खाजगी लॅबला टेस्टची परवानगी दिली आहे. याठिकाणी मात्र टेस्टसाठी 4500 रुपये घेतले जात आहे.

हे वाचा : अतिशहाणपणा नडला, 'कोरोना चॅलेंज' केलं व्हायरल आता त्यालाच झाला व्हायरस

First published: March 27, 2020, 5:17 PM IST

ताज्या बातम्या