मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अलिशान रुमपेक्षाही कमी नाही ही रिक्षा! आनंद महिंद्राही झाले फिदा, पाहा VIDEO

अलिशान रुमपेक्षाही कमी नाही ही रिक्षा! आनंद महिंद्राही झाले फिदा, पाहा VIDEO

या अनोख्या रिक्षाचा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे.

या अनोख्या रिक्षाचा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे.

या अनोख्या रिक्षाचा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे.

    मुंबई, 12 जुलै : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. रिक्षामध्ये तरुणानं केलेल्या या जुगाडाचं सोशल मीडियावर तुफान कौतुक होत असल्याचं पाहायला मिळत आहे. महिंद्रा ग्रूपचे चेअरमन आनंद महिंद्र यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. कोरोना व्हायरसच्या काळात संसर्ग रोखण्यासाठी आणि ग्राहकांना उत्तम सुविधा पुरवण्यासाठी भन्नाट रिक्षा रिनोव्हेट केली आहे. या रिक्षामध्ये Wifi सेवा, हॅण्ड सॅनिटायझर, हात धुवण्यासाठी बेसिन आणि पाणी, डस्टबिन आणि छोट्या झाडांची रोप असलेल्या कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. हे वाचा-अवघ्या 10 सेकंदात पाडलं जगातलं सर्वात मोठं स्टेडियम, पाहा थरारक LIVE VIDEO या अनोख्या रिक्षाचा व्हिडीओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'कोरोनाच्या काळात या रिक्षा चालकानं स्वच्छ भारतची जाहिरात केली आहे. हा ऑटोचा व्हिडीओ आर्थिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या मुंबईतील आहे. हे स्पष्ट करा की कोरोनाव्हायरस टाळण्यासाठी, वारंवार हात धुणे, स्वच्छता करणे, मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सचं पालन करणं महत्वाचे आहे. या भन्नाट रिक्षाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Viral video.

    पुढील बातम्या