Home /News /viral /

Corona Virus ची दहशत, टॉयलेट पेपरसाठी 3 महिलांमध्ये तुफान हाणामारी, VIDEO VIRAL

Corona Virus ची दहशत, टॉयलेट पेपरसाठी 3 महिलांमध्ये तुफान हाणामारी, VIDEO VIRAL

एका टॉयलेट पेपरसाठी तीन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

    सिडनी, 08 मार्च : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता स्वच्छतेकडे सर्वांचं जास्त लक्ष आहे. प्रत्येकजण अगदी घरातील स्वच्छतेपासून ते वैयक्तीक स्वच्छतेपर्यंत प्रत्येकजण आपली काळजी घेत आहे. त्यात महत्त्वाची अडचण म्हणजे टॉयलेट सोप, हॅण्डवॉश, टॉयलेट पेपरचा तुटवडा आहे. त्यामुळे बाजारात ह्या वस्तू होलसेलमध्ये घेण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली आहे. त्यातच एका सुपरमार्केमध्ये टॉयलेट पेपर खरेदी कऱण्यासाठी आलेल्या तीन महिलांमध्ये तुफान जुंपल्याचं पाहायला मिळालं. प्रत्येकाला हे टॉयलेट पेपर हवे होते. त्यामुळे ते पेपर घेण्यासाठी तिघींमध्ये जोरदार वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि महिलांनी अक्षरश: एकमेकींचे केस धरून तुफान हाणामारी केल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. महिलांच्य़ा या डब्लूडब्लूएफचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा एकच नाही तर असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. यामध्ये टॉयलेट पेपरसाठी भांडताना किंवा एकमेकांच्या हातातून खेचून घेताना लोक पाहायला मिळत आहेत. 8 हजारहून अधिक लोकांनी या व्हिडीओला रिट्विट केलं आहे तर 21 हजार लोकांनी लाईक केला आहे. हा व्हिडीओ ऑस्ट्रेलियातील असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 70वर आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ नये यासाठी विशेष काळजी नागरिकांकडून घेतली जात आहे. स्वच्छतेच्या वस्तूंचा तुटवडा असल्यानं त्या घेण्यासाठी नागरिकांमध्ये बाजारात भांडण होत असल्याचं दिसत आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या