व्हेंटिलेटरवर असलेल्या कोरोना रुग्णानं वायोलिन वाजवून मानले डॉक्टरांचे आभार, डोळ्यात अश्रू आणणारा VIDEO

नर्सनं दिलेल्या माहितीनुसार शिक्षक असलेला कोरोना रुग्ण एक महिन्यापासून व्हेंटिलेटरवर होता. त्याला बोलतादेखील येत नव्हतं.

नर्सनं दिलेल्या माहितीनुसार शिक्षक असलेला कोरोना रुग्ण एक महिन्यापासून व्हेंटिलेटरवर होता. त्याला बोलतादेखील येत नव्हतं.

  • Share this:
    नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर : कोरोना काळात डॉक्टर, नर्स, पोलीस यांनी रात्रंदिवस एक करून कोरोनाग्रस्त, वृद्ध लहान मुलांची कठीण काळात खूप मदत केली आहे. कोरोनाविरुद्धच्या या लढाईमध्ये जगण्याची उमेद, उत्साह देणारे डॉक्टर आणि नर्स आहेत. ज्यांच्यामुळे कोरोनाविरुद्ध लढण्याचं बळ मिळतं. सोशल मीडियावर डोळ्यात पाणी आणणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. एक संगीत शिक्षकाला कोरोनाची लागण झाली आणि त्याच्यावर रुग्णालयात वेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत. कोरोनाविरुद्धच्या या लढाईत जगण्याची उमेद देणारं या शिक्षकाचं आवडतं वाद्य वायोलिन. नर्सनं हे वाद्य या शिक्षक असलेल्या कोरोना रुग्णाला आणून दिलं आणि त्यानं सुंदर वायोलिन वाजवून नर्स आणि डॉक्टरांचे आभार मानले आहेत. हे वाचा-गर्लफ्रेंडला भेटायला गेलेल्या प्रियकराला घरच्यांनी मारलं, सकाळी त्याला केलं जावई ही घटना अमेरिकेतील असल्याची माहिती मिळाली आहे. Intermountain Healthcare ने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. नर्सनं दिलेल्या माहितीनुसार शिक्षक असलेला कोरोना रुग्ण एक महिन्यापासून व्हेंटिलेटरवर होता. त्याला बोलतादेखील येत नव्हतं. या नर्सला माहिती मिळाली की या शिक्षकानं आपलं अख्ख आयुष्य संगीतात घालवलं आहे. मग या नर्सनं रुग्णाला वायोलिन आणून दिलं आणि काय चमत्कार झाला. या रुग्णाला वायोलिन देण्याबाबत रुग्णालयातून परवानगी घेण्यात आली. त्यानंतर नर्सनं वायोलिन दिलं आहे. वायोलिन पाहून हा रुग्ण खूप खूश झाला आणि त्यानं वायोलिन वाचवून सर्व डॉक्टरांचे आभार मानले आहेत.
    Published by:Kranti Kanetkar
    First published: