मुंबई, 01 जानेवारी : काही दिवसांपूर्वी एका भुकेलेल्या श्वानाला खायला घातल्यानंतर त्याच्या डोळ्यात अश्रू आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. प्राण्यांना देखील भावना असतात आणि त्यांना माणसांची भाषा समजते त्यांना बोलता येत नसेल तरी ते आपल्या कृतीतून त्यांच्या भावना आणि त्याचं प्रेम व्यक्त करत असतात.असाच एक भारी व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एक क्षण पाहिल्यावर काहीच वाटणार नाही पण नीट पाहिलं तर या व्हिडीओमधली मजा काय आहे ती समजेल.
साधारण कुत्रा-मांजर किंवा पाळीव प्राण्यांना आपण हाय-हॅलो किंवा माणसांची भाषा शिकवतो. पण अनेकवेळा जंगलातील किंवा अभयारण्यातील प्राण्यांना देखील ही भाषा अवगत होत असेल आणि त्यांनी असं काही केलं तर आपल्या भुवया आश्चर्यानं उंचावतील.
Coolest grizzly on the planet. Absolute swag. #shared pic.twitter.com/65r2nMPutr
— Praveen Angusamy, IFS 🐾 (@PraveenIFShere) December 30, 2020
Coolest thing 👍
— Prafful Sarda™ (@prafful_sarda) December 30, 2020
Lazy Swag 😎
— RVPS (@vinay198204) December 31, 2020
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की अस्वल शांतपणे बसलेलं असताना पर्यटक त्याला हाका मारून जाग करतात. ते अस्वल त्यांच्याकडे पाहातं आणि त्यांना एक हात वर करून hi केल्यासारखा इशारा करतं. त्यानंतर पर्यटक त्याला खायला देतात. ब्रेडचा स्लाइस त्याच्या दिशेनं फेकतात अस्वल अगदी आपलं कसब वापरून हा तुकडा कॅच घेतला आणि ब्रेड खाल्ला.
अस्वलानं केलेल्या हायची आणि त्याच्या अॅटिट्यूडची सोशल मीडियावर मात्र तुफान चर्चा रंगली आहे. 13500 हून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. IFS प्रवीण यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral videos