भिवंडीच्या खाडीत औषधाने भरलेला कंटेनर चालला वाहत, रस्सीने बांधला पण...LIVE VIDEO

भिवंडीच्या खाडीत औषधाने भरलेला कंटेनर चालला वाहत, रस्सीने बांधला पण...LIVE VIDEO

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर थेट पुलाचा कठडा तोडून खाडी पात्रात पडून वाहत थेट कशेळी रेतीबंदरापर्यंत वाहत आला.

  • Share this:

भिवंडी, 03 ऑगस्ट : ठाण्यातील कशेळी ब्रिज जवळ एक कंटेनर थेट पुलावरून खाली खाडीमध्ये कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेतून चालकाला रेस्क्यू करून वाचवण्यात आलं आहे.

आज  सकाळी पावणे सहाच्या सुमारास हा अपघात झाला. हा कंटेनर भिवंडी वरून नावाशेवा येथे जात होता. त्यावेळी कशेळी ब्रिजवर असताना नियंत्रण सुटल्याने हा कंटेनर कठडा तोडून खाली पाण्यात पडला. या कंटेनरमधील चालकाला रेस्क्यू करण्यात आले आहे. त्याचे नाव रमेश पांडे आहे. सध्या त्याला परम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदुर येथून नाव्हा शेवा पोर्ट ट्रस्टच्या बंदरात औषधांचा माल घेऊन निघालेला कंटेनर भिवंडी - ठाणे बायपास रस्त्यावरील हायवे दिवे येथील खाडी पुलावरून  जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर थेट पुलाचा कठडा तोडून खाडी पात्रात पडून वाहत थेट कशेळी रेतीबंदरापर्यंत वाहत आला.

अजितदादांना राखी बांधताना घडला गंमतीशीर प्रकार, सुळेंनाही आवारले नाही हसू, VIDEO

त्या दरम्यान कशेळी पुलाखाली कंटेनरमधील अडकून पडलेल्या चालकास स्थानिक नागरीकांनी त्यास रस्सीच्या मदतीने वाचवले. पण कंटेनर वाहत गेला. मात्र, त्यानंतर भरतीचे पाणी वाढू लागल्यानंतर कंटेनर पुन्हा दिवे पुलाच्या दिशेने खाडीत वाहत गेला. त्यावेळी स्थानिक नावाड्यांनी कंटेनर रस्सीच्या मदतीने थांबविण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना यश आले नाही. त्यानंतर कंटेनर मुंब्रा दिशेने वाहत गेला.

Published by: sachin Salve
First published: August 3, 2020, 4:23 PM IST

ताज्या बातम्या