विजय वंजारा, मुंबई 01 एप्रिल : दुचाकीवरील स्टंटचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला असून यात एक तरुण दोन तरुणींसह धोकादायक स्टंट करताना दिसत आहे. हा व्हिडिओ मुंबईतील असून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. व्हिडिओमध्ये तरुणाने एका तरुणीला पेट्रोलच्या टाकीवर बसवलेलं दिसतं, तर दुसऱ्या तरुणीला पाठीमागे बसवलं आहे.
दोन्ही तरुणींना बाईकवर बसवून हा तरुण त्यांच्या मध्ये बसून गाडी चालवताना दिसतो. यानंतर हा तरुण वेगाने दुचाकी पळवताना आणि स्टंट करताना दिसतोय. रात्रीच्या वेळचा हा व्हिडिओ असून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा व्हिडिओ बीकेसी भागातील असल्याची माहिती समोर आली आहे.
टाकीवर एक अन् पाठीमागे दुसरी; मुंबईतील युवकाचा 2 तरुणींसह दुचाकीवर जीवघेणा स्टंट, VIDEO VIRAL pic.twitter.com/LGfbp2tweJ
— News18Lokmat (@News18lokmat) April 1, 2023
स्टंटचा हा व्हिडिओ पॅथहोल वॉरियर्स फाउंडेशन (Pothole Warriors Foundation) या अकाउंटवरून शेअर करण्यात आला होता. 'दोन तरुणींसह हेल्मेट नसलेला तरुण धोकादायक स्टंट करताना दिसला. त्यांना माहिती आहे की मुंबईतील रस्ते आता पॅथहोल फ्री झालेले आहेत. कृपया यांना पकडा', असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं. यानंतर पोलिसांनी व्हिडिओतील तिघांविरुद्ध कलम 144 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पुणेकरांनी कुत्र्यालाही घातलं हेल्मेट, अनोखी शक्कल लढवत केली जनजागृती
दरम्यान, 15 मार्च रोजी हरियाणामध्येही अशाच एका स्टंटप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. जोरावर सिंग आणि गुरप्रित सिंग अशी दोघांची नावं आहेत. सदर व्यक्ती चारचाकीमधून रहदारीच्या रस्त्यावर चलनी नोटांची उधळण करत होता. याशिवाय मुंबईतील रस्त्यावर चार तरुणी स्कूटीवर बसून अतिशय वेगात गाडी पळवत असल्याचा एक व्हिडिओही नुकताच समोर आला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Shocking video viral, Stunt video