मराठी बातम्या /बातम्या /Viral /

कंपनीने डिझाइन केली अशी खुर्ची जी कर्मचाऱ्यांना ऑफिसमधून थेट नेईल स्मशानात, लोक म्हणाले...

कंपनीने डिझाइन केली अशी खुर्ची जी कर्मचाऱ्यांना ऑफिसमधून थेट नेईल स्मशानात, लोक म्हणाले...

Coffin Shaped Office Chair

Coffin Shaped Office Chair

`एखाद्या दिवशी काम करतानाच मरशील,`असं वक्तव्य कोणाच्याही तोंडून ऐकू येतं. हे वक्तव्य गांभीर्याने नव्हे, तर सहज किंवा चिडून केलेलं असतं; पण एका कंपनीनं हे वक्तव्य गांभीर्यानं घेतलं आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 26 सप्टेंबर :`एखाद्या दिवशी काम करतानाच मरशील,`असं वक्तव्य कोणाच्याही तोंडून ऐकू येतं. हे वक्तव्य गांभीर्याने नव्हे, तर सहज किंवा चिडून केलेलं असतं; पण एका कंपनीनं हे वक्तव्य गांभीर्यानं घेतलं आहे. फर्निचर बनवणाऱ्या कंपनीनं अशी एक खुर्ची तयार केली आहे, जी काम करताना मरण पावल्यावर त्या व्यक्तीला थेट कबरीपर्यंत नेण्याची व्यवस्था आधीच करून ठेवेल. जास्त बसल्यामुळे आपण हळूहळू मृत्यूकडे खेचले जात असतो, असं डॉक्टर बऱ्याचदा सांगतात. केवळ धूम्रपानच नव्हे तर नियमित प्रमाणापेक्षा जास्त वेळ बसणंदेखील आरोग्यासाठी घातक आहे. ही म्हण एका खुर्चीमुळे प्रत्यक्षात आली आहे. इन्स्टाग्राम पोस्टवर या खुर्चीची वैशिष्ट्यं नमूद करताना कंपनीने लिहिलं आहे, की एखादा कर्मचारी ऑफिसमध्ये काम करताना मरण पावला तर मॅनेजमेंटला खुर्चीचं फक्त वरचं कव्हर ओढून अगदी सहजपणे त्याला शवपेटीत ठेवता येईल मग विचार करा अशा खुर्चीवर कोणाला बसावंसं वाटेल?

चेअरबॉक्स म्हणजेच ऑफिसमध्ये मृत्यूची तयारी

ब्रिटनच्या `चेअरबॉक्स` कंपनीने ही खुर्ची बनवली आहे. `द लास्ट शिफ्ट ऑफिस चेअर` अशी टॅगलाइन तिला देण्यात आली आहे. ही खुर्ची अशा व्यक्तींसाठी डिझाइन केली आहे, जे कम्प्युटरवर बराच वेळ बसून काम करतात. ताबूतचं डिझाइन असलेल्या एका कास्केटवर ती बनवली गेली आहे. खुर्चीचं 3D मॉडेल ऑफिसमधल्या खुर्चीला शवपेटीच्या स्वरूपात दाखवतं. यामुळे कामाच्या ठिकाणच्या संस्कृतीवर उपहासात्मक भाष्य करण्यात आलं आहे. अशा फ्रेमची खुर्ची बनवण्याची कल्पना चेयरबॉक्सला स्वानुभवातून सुचली आहे. कारण तिथं कर्मचारी बरेच तास बसून काम करतात. इंटरनेटवर या खुर्चीचे फोटो व्हायरल झाले असून, त्यावर अनेकांनी `नो थॅंक्स` अशी कमेंट केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Chairbox (@chairboxdesign)

आठ तास बसून काम करणं आहे जोखमीचं

कंपनीनं आपल्या वेबसाइटवर लिहिलं आहे, `माणूस आठ तास खुर्चीत बसण्यासाठी नाही. आपलं शरीर अद्याप हा व्यावहारिक बदल स्वीकारू शकलेलं नाही. व्यायाम करूनही तो पुरेसा ठरत नाही. ब्रिटनमध्ये कर्मचाऱ्यांना स्टॅंडिंग डेस्क उपलब्ध करून देण्याचा कायदा आहे. त्याविषयी अद्याप पुरेशी जनजागृती झालेली नाही. तुम्ही हे संपूर्ण आठवडाभर करता, म्हणून आम्ही लास्ट शिफ्ट ऑफिस चेअर हे आमचं उत्पादन लॉंच करत आहोत. काम करत असताना जर एखाद्याचा मृत्यू झाला तर कंपनीला फक्त ती खुर्ची वरून बंद करून त्या कर्मचाऱ्याला सहज कब्रस्तानात घेऊन जाता येईल.`

First published:

Tags: Viral, Viral news