मराठी बातम्या /बातम्या /Viral /महिला कर्मचाऱ्याला एक तास कमी कामाची सवलत देण्यास कंपनीचा नकार; द्यावी लागली 2 कोटींची भरपाई

महिला कर्मचाऱ्याला एक तास कमी कामाची सवलत देण्यास कंपनीचा नकार; द्यावी लागली 2 कोटींची भरपाई

मुलीच्या जन्मानंतर रजा संपल्यानंतर जेव्हा ती पुन्हा कामावर रुजू झाली तेव्हा तिनं बाळ लहान असल्यानं आपल्या बॉसकडे आठवड्यातून चार दिवस काम करण्याची आणि दररोज एक तास लवकर घरी जाण्याची परवानगी मागितली.

मुलीच्या जन्मानंतर रजा संपल्यानंतर जेव्हा ती पुन्हा कामावर रुजू झाली तेव्हा तिनं बाळ लहान असल्यानं आपल्या बॉसकडे आठवड्यातून चार दिवस काम करण्याची आणि दररोज एक तास लवकर घरी जाण्याची परवानगी मागितली.

मुलीच्या जन्मानंतर रजा संपल्यानंतर जेव्हा ती पुन्हा कामावर रुजू झाली तेव्हा तिनं बाळ लहान असल्यानं आपल्या बॉसकडे आठवड्यातून चार दिवस काम करण्याची आणि दररोज एक तास लवकर घरी जाण्याची परवानगी मागितली.

    नवी दिल्ली, 9 सप्टेंबर : जगभरात नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांची (Working Women) संख्या मोठी आहे; पण घर सांभाळून नोकरी करणे ही त्यांच्यासाठी तारेवरची कसरत असते. विशेषतः लहान मुलं असतील तर एका आईला नोकरी करणं हे मानसिकदृष्ट्याही जिकिरीचं असतं. अशावेळी कंपनीचं व्यवस्थापन तसंच सहकारी महिला कर्मचाऱ्याला सहकार्याची भूमिका घेत असतील तर महिलांना दिलासा मिळतो. मात्र काही वेळा कंपनीचं व्यवस्थापन ताठर भूमिका घेत असेल तर महिला कर्मचाऱ्यांचा त्रास वाढतो. अशा परिस्थितीला सामोरं जावं लागलेल्या लंडनमधील (London) एका आईनं (Working Mother) मात्र कंपनीविरुद्ध तक्रार करण्याचं धाडस केलं आणि तिच्या या लढ्याला यशही मिळालं आहे. कामाच्या वेळेत सवलत देण्यास नकार देणाऱ्या कंपनीला आपल्या निर्णयाचा चांगलाच फटका बसला असून, महिला कर्मचाऱ्याला दोन कोटी रुपयांची नुकसान भरपाई (Compensation) द्यावी लागली आहे.

    लंडनमधील एका कंपनीत एलीस थॉम्पसन (Alice Thompson) सेल्स मॅनेजर (Sales Manager) म्हणून उत्तम काम करत होती. वर्षाला तिला साधारण एक कोटी 21 लाख रुपयांची प्राप्ती होत असे. दरम्यान, 2018 मध्ये तिला मुलगी (Baby Girl) झाली. मुलीच्या जन्मानंतर रजा संपल्यानंतर जेव्हा ती पुन्हा कामावर रुजू झाली तेव्हा तिनं बाळ लहान असल्यानं आपल्या बॉसकडे आठवड्यातून चार दिवस काम करण्याची आणि दररोज एक तास लवकर घरी जाण्याची परवानगी मागितली. मात्र बॉस सेलरनं कंपनीचं नुकसान होत असल्यानं अशी मागणी मान्य करू शकत नाही, असं सांगत एलीसची मागणी फेटाळून लावली. अखेर नाईलाजानं एलीसनं नोकरीचा राजीनामा दिला. मात्र कंपनीविरुद्ध तिनं एम्प्लॉयमेंट ट्रिब्युनलकडे (Employment Tribunal) धाव घेतली. आजतक डॉट इननं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

    आपोआपच हलू लागली समोरची खुर्ची; CCTV फुटेज तपासताच महिलेला बसला धक्का, भीतीदायक VIDEO

    एलीस आपल्या मुलीला पाळणाघरात (नर्सरी) सोडून येत असे. ते पाच वाजता बंद होत असे. त्यामुळे एलिसला पाच वाजण्यापूर्वी मुलीला तिथून घेणं आवश्यक होतं. मात्र ऑफिस सहा वाजता बंद होत असल्यानं एलीसला अडचण येत होती, त्यामुळे तिनं संध्याकाळी सहाऐवजी पाच वाजता घरी जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी तिनं बॉस पॉल सेलरकडे केली.

    आपल्या मुलीलाही ती मोठी झाल्यावर असा अनुभव येऊ नये, अशा अडचणीला सामोरं जायला लागू नये या उद्देशानं आपण ही तक्रार करत असल्याचं एलिसनं स्पष्ट केलं. एलीस आणि कंपनी दोन्हीच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर एम्प्लॉयमेंट ट्रिब्युनलनं कंपनीनं सवलती नाकारून एलीसला आर्थिक आणि मानसिक त्रास दिला असल्याचा, तसंच तिच्यासोबत भेदभाव (Sex Discrimination) केल्याचा निष्कर्ष नोंदवत एक कोटी 87 लाखांहून अधिक रक्कम नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला.

    एम्प्लॉयमेंट ट्रिब्युनलच्या या निर्णयामुळे महिला कर्मचाऱ्यांच्या अडचणीचा सहानुभूतीनं विचार न करणाऱ्या कंपन्यांना चांगलाच धडा मिळाला असून, यापुढे तरी त्यांच्या भूमिकेत बदल होईल, अशी अपेक्षा आहे.

    First published:

    Tags: Job, Viral