मुंबई, 17 मे : रंग बदलणारा प्राणी कोणता विचारला तर साहजिकच आपण सरडा म्हणतो. रंग बदलणारा सरडा आपणा सर्वांना माहितीच आहे. पण रंग बदलणारा मासा (Fish video) कधी पाहिला आहे का? (Fish changing colour video) रंगबेरंगी मासे पाहिले असतील पण रंग बदलणारा मासा नक्कीच नाही (Changing colour fish video). अशाच एका माशाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. पाण्याबाहेर काढताच या माशाचा रंगच उडतो. तो अगदी काचेसारखा पारदर्शक होतो (Black Fish Becomes Transparent Coming Out Of Water).
अगदी काळाकुट्ट रंग असलेला हा मासा. पाण्यात तो अगदी स्पष्टपणे दिसतो. पाण्याबाहेर काढताच तो अगदी गायबच होतो. माशाचं टॅलेंट पाहून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल.
व्हिडीओत पाहू शकता एक काळ्या रंगाचा मासा पाण्याने भरलेल्या टबमध्ये पोहोताना दिसतो आहे. त्याचा काळा रंग इतका गडद आहे की पाण्यात तो स्पष्टपणे दिसतो आहे. एक व्यक्ती या माशाला पाण्यातून बाहेर काढते. जशी ही व्यक्ती त्या माशाला आपल्या हातात घेते तसा या माशाचा रंगच उडतो. हा मासा अगदी काचेसारखा पारदर्शक होतो. हा मासा नव्हे तर माशाच्या आकाराची काचच आहे असंच वाटतं. त्याच्या आरपार सर्वकाही दिसतं. अगदी ज्या व्यक्तीने या माशाला आपल्या हातात धरलं आहे, त्याचा माशाच्या खालील भागाचा हातही या माशाच्या आतून दिसतो आहे.
हे वाचा - चक्क एका सिंहिणीने सिंहाच्या तावडीतून केली माणसाची सुटका; कधीच पाहिला नसेल असा VIDEO
त्यानंतर ही व्यक्ती त्या माशाला पुन्हा पाण्यात टाकते. तेव्हा तो मासा पुन्हा काळ्या रंगाचा होतो आणि जेव्हा बाहेर काढलं जातं तेव्हा तो पुन्हा पारदर्शी होतो.
Glass squid that changes color instantly. pic.twitter.com/SCyRirE9cG
— Figen (@TheFigen) May 14, 2022
@TheFigen ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या जादुई माशाला ग्लास स्क्विड फिश म्हटलं जातं. हा खोल समुद्रात सापडतो. तो आपल्या त्वचेत काळ्या रंगाच्या शाईसारखा एक घटक उत्सर्जित करतो. ज्यामुळे त्याचा रंग बदलतो. यामार्फत तो आपल्या शिकाऱ्यांना चकवा देतो. रंगाप्रमाणे हा मासा आपला आकारही बदलू शकतो.
हे वाचा - प्रेमात पडल्यावर कशी बदलते व्यक्ती; हा एक PHOTO उलगडेल गुपित
याआधीही अशाच रंग बदलणाऱ्या पण मासा आणि सरडा या दोघांसारख्या दिसणाऱ्या एका प्राण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. जसं त्याच्यावर पाणी पडतं, तसं तो आपला रंग बदलत होता. व्हिडीओत पाहू शकता कधी लाल, कधी हिरवा, कधी पिवळा, कधी निळा, कधी गुलाबी, कधी जांभळा असे किती तरी रंग हा प्राणी दाखवतो.
View this post on Instagram
@gyansamay इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आता हा प्राणी खरंच असं रंग बदलतो का? व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. काही नेटिझन्सच्या मते हे एडिटिंग आहे, प्रत्यक्षात हा प्राणी रंग नाही बदलत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fish, Other animal, Viral, Viral videos