Home /News /viral /

भेटण्यासाठी सतत प्रेयसीच्या घरी जायचा; पण लग्नास द्यायचा नकार, शेवटी लोकांनी शिकवला धडा

भेटण्यासाठी सतत प्रेयसीच्या घरी जायचा; पण लग्नास द्यायचा नकार, शेवटी लोकांनी शिकवला धडा

प्रियकर त्याच्या प्रेयसीला अनेकदा तिच्या घरी भेटायला जायचा. मुलीचे कुटुंबीय लग्नाबाबत बोलायचे तेव्हा तो हा विषय टाळायचा. आसपासच्या लोकांना तरुणाचं अशा प्रकारे मुलीच्या घरी येणं पसंत नव्हतं.

    पाटणा 17 मे : देशभरात सध्या लग्नसराईचा सीझन (Wedding Season 2022) सुरू आहे. आपल्याला रोज कुठेतरी शहनाईचा आवाज ऐकू येतो. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा लग्नाबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हीही तोंडात बोटं घालाल. ही घटना बिहारमधील आहे, जी मुंगेर येथील प्रियकर आणि नवादाच्या प्रेयसीची कथा आहे (Weird Love Story). प्रियकर त्याच्या प्रेयसीला अनेकदा तिच्या घरी भेटायला जायचा. मुलीचे कुटुंबीय लग्नाबाबत बोलायचे तेव्हा तो हा विषय टाळायचा. आसपासच्या लोकांना तरुणाचं अशा प्रकारे मुलीच्या घरी येणं पसंत नव्हतं. Honeymoon Trip चं गिफ्ट पडलं भारी; हनीमून सोडून पळालं कपल कारण... मागच्या वेळी तो तरुण प्रेयसीच्या घरी आल्यावर आसपासच्या लोकांनी त्याला पकडलं आणि त्याच्या संमतीने त्याचं या मुलीशी लग्न लावून दिलं. अशाप्रकारे अखेर या गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचं लग्न झालं. मिळालेल्या माहितीनुसार, नवादा येथील हिसुआमधून एका अनोख्या निकाहचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकारामुळे या लग्नाची संपूर्ण परिसरात चर्चा होत आहे. मुंगेर येथील एका तरुणाला पकडल्यानंतर स्थानिक लोकांनी त्याचा निकाह केला, त्यानंतर बराच काळ थांबलेला विवाह अखेर संपन्ना झाला. हे विवाह प्रकरण हिसुआच्या खानखनापूर येथील आहे. परिसरातील नागरिकांच्या पुढाकाराने हा निकाह संपन्न झाला. मुलाच्या संमतीनंतरच विवाह पार पडला. राजू खान हा तरुण मूळचा मुंगेर जिल्ह्यातील आहे. तो नया गाव रहिवासी मोहम्मद कलाम खान यांचा मुलगा आहे. हिसुआ येथील खानखनापूर रहिवासी बुलंद अख्तर यांची मुलगी शबाना परवीन हिच्यावर राजूचं प्रेम होतं, मात्र मागच्या एका वर्षापासून तो तिच्यासोबत लग्न करणं टाळत होता. VIDEO- उतावळ्या नवऱ्याने मंडपातच नवरीबाईला...; बिच्चारीला शेवटी लपवावं लागलं तोंड राजू खानच्या या वृत्तीमुळे मुलीचे कुटुंबीय चिंतेत असायचे. मुलगी आणि तिचे कुटुंबीय लग्नासाठी दबाव आणत होते, मात्र राजू अनेकदा लग्न पुढे ढकलत होता. यादरम्यान तरुणाचं मुलीच्या घरी येणं-जाणं सुरूच होतं. लग्नाशिवाय तरुणाच्या मुलीच्या घरी वारंवार येण्याने स्थानिक लोकांमध्ये संतापाची लाट पसरली होती. अनेकदा तो मुलीच्या घरी येत असे. अखेर एकदा हा तरुण हिसुआ येथे आल्यानंतर स्थानिक लोकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन तरुणाचा निकाह केला. त्यासाठी राजू खान याची संमतीही घेण्यात आली. यानंतर लग्नाची तयारी करण्यात आली आणि मौलानाला बोलावून निकाह पठण करण्यात आले. यावेळी मुलीचे कुटुंबीय, सामाजिक कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Love story, Wedding

    पुढील बातम्या