मराठी बातम्या /बातम्या /Viral /

कसं शक्य आहे? शिमला मिरचीच्या आत बिया नव्हे तर चक्क नाणी; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO

कसं शक्य आहे? शिमला मिरचीच्या आत बिया नव्हे तर चक्क नाणी; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO

शिमला मिरचीच्या आत सापडली नाणी.

शिमला मिरचीच्या आत सापडली नाणी.

शिमला मिरचीच्या आत सापडली नाणी.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 14 ऑक्टोबर : आतापर्यंत काही भाज्यांमध्ये गणपती किंवा इतर आकार दिसल्याची काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. पण एखाद्या भाजीच्या (Vegetables) आतून नाणी निघतायेत, असं सांगितलं तर? खरंतर तशी ही अतिशयोक्तीच आहे. त्यामुळे साहजिकच यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. पण सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यामध्ये चक्क शिमला मिरचीच्या आत नाणी सापडली आहेत (Coins inside capsicum).

शिमला मिरचीच्या (Capsicum video) आतमध्ये बिया असतात. पण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या शिमला मिरचीच्या (Capsicum shocking video) आता बिया नव्हे तर चक्क नाणी आहेत. शिमला मिरची कापताच त्याच्या आतून नाणी बाहेर पडत आहेत. व्हिडीओ पाहून तुम्ही थक्कच व्हाल. तुमच्या तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही. हे कसं काय शक्य आहे? असंच तुम्ही म्हणाला.

व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती शेतात बसला आहे. या शेतात शिमला मिरचीची लागवड करण्यात आली आहे. ही व्यक्ती तिथली एक शिमला मिरची हातानेच फोडते तेव्हा त्यात काय असतं, तर चक्क नाणी.

हे वाचा - OMG! चक्क डोक्यावर ठेवली 735 अंडी; VIDEO पाहून तोंडात घालाल बोटं

एक दोन नव्हे तर अशी बरीच नाणी या एका शिमला मिरचीत आहे. बरं फक्त हे या एका शिमला मिरचीपुरतं नाही. तर ही व्यक्ती दुसरी शिमला मिरचीसुद्धा फोडते, तर त्यातही अशीच नाणी आहेत. ही व्यक्तीसुद्धा शॉक असल्याचं एकंदर तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होतं.

View this post on Instagram

A post shared by FilmFlix (@filmflix3)

filmflix3 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ खूप विचित्र आहे, आपण असं कधीच पाहिलं नाही, अशी प्रतिक्रिया काही युझर्सनी दिली आहे.

हे वाचा - Knowledge Story: 1 लिटर पाण्याच्या किमतीत येईल 2 BHK फ्लॅट, का आहे इतकं महाग?

आता ही शिमला मिरची तर कापलेली दिसत नाही आहे. कुठूनही या शिमला मिरचीला छेद दिसत नाही आहेत. शेतातच ही शिमला मिरची आहे आणि तिथंच ती खोलून दाखवण्यात आली आहे.  पाहून सर्वजण हैराण झाले आहेत आणि आपापले तर्कवितर्क लढवताना दिसत आहेत. या व्यक्तीनेच या शिमला मिरचीत नाणी टाकील असावीत, असं म्हटलं आहे. तर एकान ही व्यक्ती प्रसिद्धीसाठी हे सर्व करत आहे असं काही युझर्सनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Shocking viral video, Vegetable, Viral, Viral videos