ईईई! या व्यक्तीच्या कानात केलं झुरळानं घर! डॉक्टरांनी बाहेर काढलं 10 झुरळांचं 'बिऱ्हाड'

कुणाच्या कानात जिवंत झुरळं सापडली असं सांगितलं तर... किळसवाणी असली तरी ही गोष्ट खरी आहे. बघा नेमकं काय झालंय ते...

News18 Lokmat | Updated On: Nov 9, 2019 06:45 PM IST

ईईई! या व्यक्तीच्या कानात केलं झुरळानं घर! डॉक्टरांनी बाहेर काढलं 10 झुरळांचं 'बिऱ्हाड'

बीजिंग, 7 नोव्हेंबर : घरात साफसफाई करताना एखाद्या अडगळीच्या कोपऱ्यात झुरळाची अंडी दिसतात किंवा कधी सफाईच्या वेळी एकदम दारामागनं छोटी झुरळं बाहेर येताना दिसतात. पण कुणाच्या कानात जिवंत झुरळं सापडली असं सांगितलं तर... किळसवाणी असली तरी ही गोष्ट खरी आहे. चीनमध्ये झुरळाच्या मादीने एका व्यक्तीच्या कानातच आपलं 'बिऱ्हाड' थाटलं होतं. कान दुखतो आणि खाजतो म्हणून तो डॉक्टरकडे गेला, तेव्हा या गोष्टीचा उलगडा झाला.

'डेली एक्स्प्रेस'ने दिलेल्या माहितीनुसार, चीनमधल्या गाँगडॉंग प्रांतातील एका रुग्णालयात 24 वर्षांची एक व्यक्ती कान दुखत असल्याची तक्रार घेऊन आली. कानात काहीतरी वळवळल्यासारखं वाटतं, असं त्या तरुणाने सांगितलं. त्याची तपासणी केली असता डोळे विस्फारायला लावणारी माहिती समोर आली. नाक कान घशाच्या तज्ज्ञ डॉक्टरांना या व्यक्तीच्या कानात एक-दोन नव्हे तर चक्क 10 छोटी झुरळं आणि एक मोठं झुरळ - आढळलं.

वाचा - ताकद देणारं अंड तुमचा जीवही घेऊ शकतं, ही घ्या काळजी!

कानात काहीतरी वळवळतंय असं वाटत होतं, पण नंतर कान प्रचंड दुखायला लागल्यावर त्याने ल्वी नावाच्या व्यक्तीने डॉक्टर गाठला.  त्याच्या कानात नकळतपणे घुसून त्या झुरळाच्या मादीने अंडी घातली असावीत आणि कानातच पिलांचा जन्म झाला असावा. सुरुवातीला डॉक्टरांना आकाराने लहान आणि फिकट रंगाचे किडे दिसले. तपासणी झाल्यावर ती झुरळाची पिल्लं असल्याचं दिसून आलं. यानंतर डॉक्टरांनी चिमट्याने एक-एक करून या पिल्लांना बाहेर काढलं. तेव्हा या व्यक्तीच्या कानात आणखी एक मोठं झुरळ असल्याचंही दिसून आले. याच झुरळाच्या मादीने पिल्लांना जन्म दिला असावा.

वाचा - दररोज झोपताना 2 लवंग खाऊन पाणी प्या, यानंतर मिळणारा फायदा खूप काही देऊन जाईल

Loading...

या सगळ्याची डॉक्टरांनी अधिक चौकशी केली साऱ्या प्रकाराचा उलगडा झाला. हा तरुण झोपताना बेडच्या शेजारी खाद्यपदार्थांची पाकिटं तशीच ठेवून झोपायचा. या सवयींमुळे घरात कीटक होते. झोपेत असताना नकळत झुरळाने कानात प्रवेश केला असावा. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

------------------------

जीव वाचवण्यासाठी मुलगी भिंतीला चिकटली, पण कारने दिली धडक LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 9, 2019 06:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...