• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • बापरे! किचन नव्हे तर मेट्रोमध्ये शिरलं झुरळ; प्रवाशांना अक्षरशः नाकीनऊ आणलं, पाहा मजेशीर VIDEO

बापरे! किचन नव्हे तर मेट्रोमध्ये शिरलं झुरळ; प्रवाशांना अक्षरशः नाकीनऊ आणलं, पाहा मजेशीर VIDEO

तुम्ही झुरळ घरात किंवा किचनमध्ये अनेकदा पाहिलं असेल. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ मेट्रोमधील आहे (Cockroach Entered in Metro).

 • Share this:
  नवी दिल्ली 24 नोव्हेंबर : झुरळ हा अतिशय लहान जीव आहे. अनेकदा झुरळ किचनमध्ये किंवा घरात इतर ठिकाणी पाहायला मिळतात. या जीवामुळे अनेकदा लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. कारण याच्यामुळे अनेकदा घरातील अन्नपदार्थही विनाकारण खराब होतात आणि टाकून द्यावे लागतात. चित्रपटांमध्ये अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की मुली झुरळांना पाहून घाबरतात आणि मोठमोठ्याने ओरडू लागतात. मात्र कधीकधी खऱ्या आयुष्यातही असंच दृश्य पाहायला मिळतं. सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Funny Video Viral on Social Media) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. या व्हिडिओमध्ये झुरळ पाहून ओरड्यासारखं तर काही नाही. मात्र या झुरळाला पाहून सगळे लोक आपल्या जागेवरुन उठताना दिसतात. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही नक्कीच हसू येईल. तुम्ही झुरळ घरात किंवा किचनमध्ये अनेकदा पाहिलं असेल. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ मेट्रोमधील आहे (Cockroach Entered in Metro). यात दिसतं की झुरळाने एका व्यक्तीला अक्षरशः घाम फोडला. हा व्यक्ती मेट्रोमध्ये एका झुरळाला बघतो. यानंतर तो हे झुरळ आपल्या पाण्याच्या बाटलीत पकडण्याचा प्रयत्न करतो. यापुढे जे घडतं ते अतिशय मजेशीर आहे.
  हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर सबवे क्रिएचर्स नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ शेअर करत यूजरनं कॅप्शन दिलं, त्याने पाण्याच्या बाटलीत झुरळाला पकडण्याचा प्रयत्न केला आणि ते उडू लागलं #subwaycreatures. हा व्हिडिओ आतापर्यंत 8 लाखहून अधिकांनी पाहिला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने हा व्यक्ती झुरळाला बाटलीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे आणि इतर लोक झुरळाला पाहून घाबरुन दूर पळत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. लोकांनी व्हिडिओवर कमेंट करत सांगितलं की जर ते यावेळी मेट्रोमध्ये असते तर त्यांनी काय केलं असतं. एका यूजरने कमेंट करत म्हटलं, मी तर मेलोच असतो, इनस्टंट हार्ट अटॅक. तर आणखी एकानं लिहिलं, मी तर या ट्रेनमधून दोन सेकंदातच फरार झालो असतो.
  Published by:Kiran Pharate
  First published: