मनिला, 28 ऑक्टोबर : कधी कोणत्या कोंबड्यानं जीव घेतल्याचे ऐकले आहे का? मात्र असा प्रकार खरच घडला आहे. फिलिपिन्समध्ये (Philippines) एका कोंबड्यानं पोलीस कर्मचाऱ्याचा जीव घेतल्याची घटना समोर आली आहे. कोंबड्यांच्या बेकायदेशीर लढाईत छापा टाकणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कोंबड्यानं हल्ला केला ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
कोबड्यांच्या लढाईत सामिल असलेल्या या फायटर कोंबड्याच्या पायावर ब्लेड होते. पोलीस अधिकारी त्याला पकडण्यासाठी गेल्यानंतर ब्लेडनं रक्तवाहिनी कापली गेली. यामुळे पोलीस अधिकारी लेफ्टनंट ख्रिश्चन बोलोक यांचा मृत्यू झाला. असे सांगितले जात आहे की बोलॉक हा कोंबड्यांच्या बेकायदेशीर खेळाविषयी पुरावे गोळा करण्यासाठी तेथे गेला होता.
वाचा-भररस्त्यात मारली गोळी, मग काढला मृतदेहाचा फोटो; थरकाप उडवणारा मर्डरचा LIVE VIDEO
डेली मेलच्या वृत्तानुसार पोलिसांचे प्रमुख कर्नल आर्नेल आपुद म्हणाले की, या घटनेत कोंबडीच्या पायाच्या धारदार ब्लेडनं काटाने ख्रिश्चन बोलोकच्या डाव्या मांडीच्या धमनीत अडकले आणि कापला गेला. यामुळे पोलिस कर्मचार्याच्या पायातून बरेच रक्त गेले. फिलिपिन्समध्ये कोंबडीच्या लढाईला 'तुपडा' म्हणतात आणि ते खूप लोकप्रिय आहे. लोक त्यावर पैसे खर्च करतात आणि ते जुगार म्हणून प्रसिद्ध आहे.
वाचा-OMG! शरीरावर तब्बल 6,37,000 मधमाश्या; VIDEO पाहूनच अंगावर येईल काटा
कोंबडीच्या पायाला असतो ब्लेड
कोंबड्यांच्या पायावर ब्लेड लावले जाते. लढाईसाठी कोंबड्यांच्या पायात ब्लेडचा एक काटा ठेवला गेला, ज्याला गॅफ म्हणतात. दरम्यान कोरोनामुळे अशा खेळांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या या लोकांना पकडण्यासाठी गेलेल्या बोलोक यांचा मृत्यू झाला. पोलीस अधिकारी, आपुद म्हणाले की या दुर्दैवी घटनेची माहिती जेव्हा मला प्रथम मिळाली तेव्हा मला विश्वास बसला नाही. माझ्या 25 वर्षांच्या पोलीस सेवेत मी पहिल्यांदाच कोंबडीच्या लढाई दरम्यान पोलिसांनं जीव गमावल्याचे पाहिले.