नवी दिल्ली, 27 मार्च : सोशल मीडिया हे मनोरंजनाचं मोठं साधन बनलं आहे. सोशल मीडियावर लोक तासन् तास वेळ घालवतात. दिवसभरात अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात. कधी कधी तर आपल्या डोळ्यांनाही विश्वास ठेवणं अवघड होईल अशा घटना कॅमेऱ्यात कैद होतात. अशातच यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडलीये. कोंबडा आणि कुत्र्याचा एक आश्चर्यकारक व्हिडीओ समोर आलाय.
भररस्त्यात अनेक माणसे, प्राण्यांची भांडणे होत असतात. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये चक्क एक कोंबडा आणि कुत्र्याच्या भांडणाचा व्हिडीओ समोर आला आहे. एका गल्लीत कुत्रा आणि कोंबडा भांडताना स्पॉट झाला. हा व्हिडीओ पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका गल्लीमध्ये कोंबडा आणि कुत्रा जोरदार भांडण करताना दिसतायेत. एकमेकांच्या अंगावर धावत येऊन ते आपला राग व्यक्त करत आहेत. मात्र या भांडणाच मोठ्या कुत्र्यावर छोटा कोंबडा भारी पडलेला दिसला. कोंबड्याने आपल्या हिंमतीने कुत्र्यालाही पळवून लावलं. सुरुवातीला व्हिडीओ बघताना वाटलं की, कुत्र्यापुढे कोंबडा हार मानेल आणि पळ काढेल मात्र त्याच्या जिद्दीने आणि हिमतीने त्याने कुत्र्यालाच धूम ठोकायला भाग पाडले.
कुत्रा आणि कोंबड्याच्या भांडणाची ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. आसपासचेही लोक त्यांची भांडण पाहून शूट करताना दिसले. हा व्हिडीओ सोनू शर्मा नावाच्या फेसबुक अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओवर अनेक लाईक्स आणि कमेंटचाही वर्षाव होताना दिसतोय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media viral, Top trending, Videos viral, Viral