मुंबई, 29 नोव्हेंबर : सोशल मीडियावर रोज विविध प्रकारचे हजारो फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात अनेकदा प्राण्यांच्या किंवा पक्ष्यांच्या लढाईचे व्हिडिओही असतात. एखादा प्राणी दुसऱ्यावर वरचढ ठरतो आणि शिकार करतो,असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. जंगलातील अनेक प्राण्यांमध्ये वैर असतं,त्यामुळे त्यांच्यात एकमेकांबद्दलची खुन्नस आणि कोण वरचढ आहे,हे दाखवण्यासाठी झुंज होते. एकाच कुळातील अनेक प्राणीही आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी भांडत असतात. असाच एक साप आणि किंग कोब्राचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे.
तुम्ही अजगराने दुसऱ्या प्राण्याला किंवा माणसाला जिवंत गिळल्याचे काही व्हिडिओ पाहिले असतील किंवा बातम्या ऐकल्या असतील. अजगर हा विशाल प्राणी आहे,त्यामुळे तो हल्लाकरूनएखाद्या सहा फुटांच्या माणसाचा किंवा प्राण्यांना पूर्णपणे जिवंत गिळू शकतो. पण कोब्रा असं करू शकत नाही. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओत कोब्राने सापाला जिवंत गिळलंय. होय,एका कोब्राने सापाला जिवंत गिळल्याचा हा प्रकार पहिल्यांदाच या व्हिडिओत पाहायला मिळाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत.
हेही वाचा - Viral Video: ...जेव्हा माकडाला येतो राग; मग असं फोटोसेशन करणं जाल कायमचे विसरून
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की,बऱ्याच वेळाने किंग कोब्राचा सामना अनेक फूट लांब सापाशी झाला. सामना होताच सापाने कोब्रावर हल्ला केला,त्यावर किंग कोब्रानेही पलटवार करत उत्तर दिलं. कोब्राने हल्ला करत लगेचच सापाचं तोंड पकडलं. व्हिडिओत कोब्रा आणि सापाची लढाई अंगावर शहारे आणणारी आहे.
View this post on Instagram
सापाचं तोंड पकडताच किंग कोब्राने त्याचा जिवंत गिळण्यास सुरुवात केली. किंग कोब्राने सापाचं तोंड पकडलं आणि नंतर तो हळूहळू त्याला गिळू लागला. एका सापाने दुसऱ्या सापाला गिळतानाचा हा व्हिडिओ खरोखरच चकित करणारा आहे. काही सेकंदांच्या व्हिडिओमध्ये किंग कोब्राने हळूहळू सापाला जिवंत गिळलं.
किंग कोब्रा अनेक फूट लांब सापाला जिवंत गिळतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हजारो आणि लाखो वेळा पाहिला गेला आहे. यावर नेटिझन्सही जोरदार कमेंट करत आहेत.beautiful_new_pixनावाच्या पेजवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरही शेअर करण्यात आला आहे. किंग कोब्रा त्याच्या इतक्याच मोठ्या सापाला जिवंत गिळू शकतो,हे या व्हिडिओत दिसतंय. व्हिडिओ पाहून नेटकरी आश्चर्य चकित झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral news, Viral video.