कोब्रानं गिळली प्लॅस्टिकची अख्खी बॉटल, पाहा मन सुन्न करणारा VIRAL VIDEO

कोब्रानं गिळली प्लॅस्टिकची अख्खी बॉटल, पाहा मन सुन्न करणारा VIRAL VIDEO

प्लॅस्टिकचा वापर करण्याआधी हा व्हिडीओ एकदा पाहाच.

  • Share this:

गोवा, 11 जानेवारी : देशात ठिकठिकाणी प्लॅस्टिक बंदी लागू करूनही आजही सर्रास लोक प्लॅस्टिकचा वापर करतात. प्लॅस्टिकमुळे केवळ मानवाला नाही तर प्राण्यांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. एका कोब्राने चुकून प्लास्टिकची संपूर्ण बाटली गिळली.

सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ 3 वर्षांपूर्वीचा असून 2017मध्ये गोवामध्ये ही घटना घडली होती. दरम्यान नुकताच भारतीय वनसेवा अधिकारी प्रवीण कसवान यांनी पुन्हा हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला.

वाचा-मुलांना सांगितलं माझ्याकडे पाहू नका, तोपर्यंत आईने केला बॉयफ्रेंडसोबत SEX

या व्हिडीओमध्ये कोब्राने अर्धा लिटरची बाटली अन्न म्हणून गिळली आणि ती पोटात अडकली. हा व्हिडिओ गोव्यातील कर्वेम-कनाकोनाचा होता. कचर्‍याच्या ढीगातून कोब्राने ही बाटली गिळली. या कोब्राला लोकांनी पाहिल्यानंतर लगेचच सर्पमित्रांना बोलवले. घटनास्थळी पोहोचलेल्या गौतम भगतने कोब्राला मदत केली आणि कोब्रानं त्यानंतर बाटली पोटातून बाहेर काढली.

वाचा-मांजरीला वाचवण्यासाठी आज्जीने नातवाला 5व्या मजल्यावर लटकवलं, पाहा Shocking Video

वाचा-भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीतून पडला चिमुकला, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

व्हिडिओ पुन्हा अपलोड करताना प्रवीण कसवान यांनी, "प्लास्टिकच्या बाटल्या वन्यजीव आणि इतर प्रजातींवर कसा परिणाम करतो ते पाहा. व्हिडिओ आपले लक्ष विचलित करू शकेल'', असे लिहिले.

Published by: Priyanka Gawde
First published: January 11, 2020, 8:07 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading