मराठी बातम्या /बातम्या /Viral /

निसर्गाचा अद्भुत चमत्कार! आकाशात वाहू लागला ढगांचा धबधबा; कधीच पाहिला नसेल असा VIDEO

निसर्गाचा अद्भुत चमत्कार! आकाशात वाहू लागला ढगांचा धबधबा; कधीच पाहिला नसेल असा VIDEO

धबधब्यासारखे कोसळू लागले ढग.

धबधब्यासारखे कोसळू लागले ढग.

धब्याधब्यासारखे कोसळणारे ढग, आकाशात असं अद्भुत दृश्य तुम्ही कधीच पाहिलं नसेल.

    मुंबई, 17 ऑगस्ट : पावसाळा म्हटलं की ़डोंगरावरून धो धो कोसळणार धबधबा पाहण्यासाठी आपण अनेक ठिकाणी जातो. सोशल मीडियावरही अशा धब्याधब्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. उंच डोंगरावरून जमिनीवर कोसळणारे असे बरेच धबधबे तुम्ही पाहिले असतील पण आकाशात कोसळणारा धबधबा कधी पाहिला आहे का? आकाशातील ढगांच्या धबाधब्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतो आहे. ज्याप्रमाणे धरती सौंदर्याने नटलेली आहे. धरतीवर वेगवेगळी सुंदर दृश्य पाहायला मिळतात. तसंच आकाशातही बरंच काही दडलेलं आहे. आजवर तुम्ही निळंशार स्वच्छंद आकाश तुम्ही पाहिलं असेल, त्यात इंद्रधनुष्य, सूर्य पाहिला असेल. रात्री काळ्याकुट्ट आकाशात चंद्र-तारे पाहिले असतील. आता पावसाळ्यात काळेकुट्ट ढग, त्यात चमकणारी वीज आणि त्यातून कोसळणारा पाऊसही तुम्हाला माहिती आहे. पण या आकाशातही असं काही दडलं आहे, जे तुम्ही आजवर कधीच पाहिलं नसेल. त्यापैकी आकाशातून कोसळणारा हा ढगांचा धबधबा. हे वाचा - अद्भुत! धरतीवरून अवकाशात कोसळली वीज, कधीच पाहिला नसेल असा निसर्गातील चमत्कार; Watch Video Cosmic Gaia ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. अवघ्या 16 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका बाजूला खाली छोटी-छोटी हिरवीगार झाडं दिसत आहे आणि त्यांच्यावर वेगाने कोसळणारा हा ढगांचा धबधबा आहे. कॉटन कँडी क्लाउड्स, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. ढगांना पळताना, विविध आकार घेताना तुम्ही पाहिलं असेल. पण ढगांमधील असं सुंदर दृश्य पाहून तुम्हीही हैराण झाला असाल. ढगांची हालचाल अशा पद्धतीने होते आहे, जणू काही तो धबधबा आहे आणि तो कोसळतो आहे, असंच वाटतं आहे. हे वाचा - ना पॅराशूट ना हॉट एअर बलून; पक्ष्यासारखे पंख पसरून उडू लागला माणूस; पाहा अद्भुत VIDEO हे दृश्य म्हणजे निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच म्हणावा लागेल. व्हिडीओ पाहून नेटिझन्स थक्क झाले आहेत. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral, Viral videos

    पुढील बातम्या