मुंबई, 17 ऑक्टोबर : होमो या गटात आपल्या होमो सेपियन्स प्रजातीबरोबरच अनेक होमो नावाच्या मानवी प्रजाती होत्या. पण आताच्या जगात होमो सेपियन्स सोडून इतर सर्व प्रजाती नष्ट झाल्या आहेत, असं अलीकडील संशोधनावरून समजून येते. तापमानात झालेली प्रचंड वाढ किंवा तीव्र थंड हवामानमुळे म्हणजेच हवामान बदलामुळे होमा प्रकारातील इतर सर्व प्रजाती नामशेष झाल्या असाव्यात असं नव्या संशोधनातून सिद्ध झालं आहे. प्राचीन काळातील आपले मनुष्य बांधव बहुधा हवामान बदलाशी जुळवून घेण्यात अपयशी ठरल्यामुळेच नामशेष झाले असावेत.
एका पथकाने त्या काळातील झालेला हवामानातील बदल पुन्हा तयार करून त्यात त्या काळातील माणसांच्या जीवाश्मांचा अभ्यास केला. ते या निष्कर्षापर्यंत पोहोचले ही तांत्रिक प्रगती आणि क्रांतिकारक शोध होऊन सुद्धा तो मानव हवामानाचा सामना करू शकला नाही. 15 ऑक्टोबरला वन अर्थ जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासात ही माहिती देण्यात आली आहे.
इटलीतल्या नापोलीमध्ये असलेल्या युनिव्हर्सिटी डी नापोली फेडरिको II मधील तज्ज्ञ पासक्वाले रिया म्हणाले, " अग्नी आणि कोरीव दगडी शस्रांचा वापर करण्याची जाण असलेल्या त्या काळातील माणसांनी क्लिष्ट अशी समाजाची रचनाही केली होती. गोंदलेली भाल्याची टोकं, व्यवस्थित कपडे आणि सांस्कृतिक देवाण-घेवाण करणारे अशा अनेक गोष्टी या विविध मानवांमध्ये दिसली होती. पण त्या काळाच्या दृष्टिने एवढ्या प्रगत असलेल्या त्या माणसांनांही हवामान बदलाचा सामना करता आला नाही.
हे वाचा-...म्हणून देशातील गरीब उपाशी; भूकबळीबद्दल काय म्हणाले राहुल गांधी?
संशोधकांच्या म्हणण्यानुसार प्राचीनकाळी अतिशय थंड हवामान झाल्यावर गरम वातावरणाच्या जाऊन परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न सुद्धा त्या काळातील माणसांनी करून पाहिला पण तो अपुरा पडला. त्यांनी मागील पाच दशलक्ष वर्षात बदलणारं तापमान, पडणारा पाऊस या सगळ्या गोष्टींचा होमो गटातील हॅबिलिस, अर्गास्टर, इरेक्टस, हेडल्बरजेनेसिस, निएंडरथलेनेसीस आणि होमो सॅपियन्सनी कसा सामना केला याचा अभ्यास या संशोधकांनी केला. हा अभ्यास जीवाश्मांच्या डेटाबेससोबत जुळला.
इरेक्टस, हेडल्बरजेनेसिस, निएंडरथलेनेसीस या तीन प्रजाती नामशेष होण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या क्लायमेटिक निशचा बहुतांश भाग गमावला होता. यावेळी जागतिक हवामानात अनेक प्रतिकूल बदल घडून आल्याचे पुरावे आहेत. त्या काळात निएंडरथलेनेसीसना त्यांच्या स्रोतांसाठी होमो सॅपियन्सची लढावं लागलं होतं त्यामुळे त्यांना टिकून राहणं अधिक कठीण झालं होतं. जर हवामानबदलांमुळे होमा प्रजातीतील या आधीच्या प्रजाती नष्ट झाल्या असतील तर तसं पुन्हाही घडू शकतं त्यामुळे माणसानी सावध व्हायला हवं असंही रिया यांचं मत आहे.