Home /News /viral /

OMG! चवताळलेला हत्ती JCB चा चुराडा करायला गेला पण...; विचारही केला नसेल असा VIDEO चा शेवट

OMG! चवताळलेला हत्ती JCB चा चुराडा करायला गेला पण...; विचारही केला नसेल असा VIDEO चा शेवट

हत्ती आणि जेसीबीची अशी फायटिंग तुम्ही कधीच पाहिली नसेल.

  मुंबई, 24 जानेवारी : हत्ती सर्वात बलाढ्य आणि बलवान प्राणी. जो आपल्या एका सोंडेत मुळापासून अख्खं झाड उखडून काढतो. एका लाथेत मोठमोठ्या गाड्यांचा चुराडा करतो. असे बरेच व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. पण आता हत्तीचा असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, ज्यात हत्ती थेट जेसीबीशी भिडला आहे.हत्ती आणि जेसीबीच्या फाइटचा हा व्हिडीओ सोशल मडियावर चांगलाच चर्चेत आला आहे (Elephant jcb fight video). हत्ती आणि जेसीबीची लढाई तुम्ही याआधी कधी पाहिली नसावी. त्यातही धक्कादायक आहे तो या लढाईचा शेवट. या फायटिंगचा शेवट तुम्ही विचारही केला नसेल असा आहे.  व्हिडीओत पाहू शकता एका शेतात एक जेसीबी उभा आहे. त्याचवेळी एक हत्ती जेसीबीच्या दिशेने धावत येत त्यावर हल्ला करतो. हत्ती इतका चवताळला आहे की तो जेसीबीशी जोरदार टक्कर देतो. हे वाचा - 2 ट्रेनच्या मध्ये अडकला घोडा; बचावासाठी शेवटपर्यंत केला प्रयत्न अन्..., VIDEO आतापर्यंत हत्तीच्या हल्ल्याचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील, तर चवताळलेला हत्ती काय करू शकतो, याची कल्पना तुम्हाला आहेच. त्याच्यासमोर कुणाचंच काही चालत नाही. समोर येणारा माणूस असो किंवा एखादी वस्तू, त्याचा चुराडा झालाच समजा. या जेसीबीलाही हत्तीने आपल्या पायाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला.
  पण जेसीबीला टक्कर देणं हत्तीला चांगलंच महागात पडलं. जेसीबीसा चिरडता चिरडता त्याला अक्षरशः घाम फुटला. अखेर त्याने हार मानली आणि त्याने माघार घेतली. आल्या पावली तो परत गेला. हे वाचा - पाळीव श्वानाला वाचवण्यासाठी अस्वलासोबत भिडला व्यक्ती; धडकी भरवणारा VIDEO wild_animals_creation नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Elephant, Viral, Viral videos, Wild animal

  पुढील बातम्या